Next
रवींद्र पिंगे, वामन निंबाळकर
BOI
Tuesday, March 13, 2018 | 12:52 PM
15 0 0
Share this story

साहित्यिक, गायक, अभिनेते, प्रकाशक अशा विविध क्षेत्रातल्या मंडळींबद्दल आस्वादकाच्या भूमिकेतून अत्यंत लालित्यपूर्ण लेखन करणारे रवींद्र रामचंद्र पिंगे आणि प्रख्यात दलित विचारवंत आणि कवी वामन सुदाम निंबाळकर यांचा १३ मार्च हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....
रवींद्र रामचंद्र पिंगे

१३ मार्च १९२६ रोजी उफळे गावात जन्मलेले रवींद्र पिंगे आपल्या लालित्यपूर्ण विपुल लेखनाबद्दल प्रसिद्ध होते.

स्वतः उत्तम खवय्ये आणि भटके असणारे पिंगे लेखनप्रक्रियेवर मनापासून प्रेम करणारे होते. वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींवर त्यांनी अतिशय ओघवती शब्दचित्रं लिहिली आहेत. 

पश्चिमेची धनदौलत, सुखाचं फूल, तुषार आणि तारे, आजचा दिनविशेष, आनंदपर्व, अत्तर आणि गुलाब पाणी, चिरेबंदी, देवाघरचा पाऊस, दुसरी पौर्णिमा, काही चंदेरी काही सोनेरी, केशरी कमळ, मानवंदना, परशुरामाची सावली, रवींद्रायन, समाधानाचे सरोवर, सर्वोत्तम, शतपावली, स्नेहतरंग, सुखाचे पदर, प्राजक्ताची फांदी – अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

त्यांना दमाणी पुरस्कार, कोकण साहित्यभूषण पुरस्कार, राज्य पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

१७ ऑक्टोबर २००८ रोजी त्यांचं निधन झालं. 

(रवींद्र पिंगे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.) 
...............

वामन सुदाम निंबाळकर

१३ मार्च १९४३ रोजी बुलढाण्यात जन्मलेले वामन सुदाम निंबाळकर हे दलित विचारवंत आणि कवी म्हणून ओळखले जातात. 

‘आजचे प्रबोधन’ हे साप्ताहिक, तसंच भीमसंदेश, अस्मितादर्श, सुमचित, प्रबोधन, लोकायत, परिचारिका या नियतकालिकांसाठी त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं होतं. 

त्यांच्या ‘महायुद्ध’ या काव्यसंग्रहाला उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचा शासनाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांना फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार तसंच उपासक-रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. २००३ सालच्या विदर्भ संघाच्या साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

अस्मितादर्शची नऊ वर्षे, आई, गावकुसाबाहेरची कविता, दलित साहित्य - एक वाङ्‌मयीन चळवळ, दलित साहित्य - स्वरूप व भूमिका, बौद्धांच्या सवलती व पंतप्रधानाचे वक्तव्य, महाकवी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महायुद्ध, राज्यघटनेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, वाहत्या जखमांचा प्रदेश, साठोत्तरी मराठी कवितेत आंबेडकरदर्शन, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

तीन डिसेंबर २०१० रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link