Next
‘फिनोलेक्स’ आणि ‘मुकुल माधव’तर्फे सेरेब्रल पाल्सीग्रस्तांची तपासणी
प्रेस रिलीज
Monday, May 20, 2019 | 05:08 PM
15 0 0
Share this article:


पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेरेब्रल पाल्सी आजाराने त्रस्त मुलामुलींसाठी राबविण्यात येत असलेल्या अभियानांतर्गत २६६ रुग्णांची तपासणी करण्यात आली. सेरेब्रल पाल्सीग्रस्तांसाठी रत्नागिरी आणि सातारा येथे दोन दिवसीय सर्वंकष मूल्यांकन आणि तपासणी शिबिर घेण्यात आले. 

रत्नागिरीत ७९ मुले आणि सातारामध्ये १८८ मुलांची तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया आणि ऑर्थोटीकसाठी सल्लाही देण्यात आला. यासाठी पुण्यातील संचेती, केईम हॉस्पिटल, एच. व्ही. देसाई हॉस्पिटल आणि रत्नागिरी व सातारा येथील वैद्यकीय टीमचा समावेश होता. आजवर ९८६ मुलांवर उपचार केल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांनी व्यक्त केली.

रत्नागिरी येथे जिल्हा परिषदेचे अधिकारी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. ठोमरे, सिव्हिल सर्जन डॉ. भोळंदे, जिल्हा परिषद एज्युकेशन डिपार्टमेंटचे गव्हाणे उपस्थित होते. सातारा येथे जिल्हा परिषदेचे अधिकारी डॉ. कैलाश शिंदे, डिस्ट्रिक्ट हेअल्थ ऑफिसर डॉ. भगवान पवार उपस्थित होते.


गेल्या २० वर्षांपासून फिनोलेक्स इंडस्ट्रीज मुकुल माधव फाउंडेशनच्या साथीने आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. उपेक्षितांना आनंद आणि जगण्याचे बळ देण्याचे काम संस्थेकडून होत आहे. आजवर हजारो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम संस्थेने केले आहे. फाउंडेशनमार्फत सेरेब्रल पाल्सी निर्मूलन अभियान २०१५ पासून राबविले जात आहे. सध्या राज्यात रत्नागिरीत दोन आणि साताऱ्यात चार अशी सहा फिनोलेक्स पुनर्वसन केंद्र सुरू आहेत.

सातारा, वाई आणि पाचगणी या केंद्रांवर संचेती हॉस्पिटल, भारती हॉस्पिटलच्या सहकार्याने समुदेशन, फिजिओथेरपी आणि स्पीच थेरपीची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर पाटण केंद्रावर कराडमधील कृष्णा हॉस्पिटलच्या मदतीने आठवड्याला फिजिओथेरपीची सोय केली आहे. अलीकडेच संस्थेने योग्य आहार आणि खाण्याच्या सवयी यासाठी आहारतज्ज्ञ जोडून घेतले आहे. या केंद्रांवर २०-२५ मुले नियमित फिजिओथेरपी घेत आहेत. आजवर ४९ शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत. झाडगांव, रत्नागिरी येथील केंद्रावर डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमधील फिजीओथेरपीस्ट आणि स्पीच थेरपिस्टची नियुक्त केले आहेत.


आशा आणि एएनएम परिचारिकांना प्रशिक्षित करण्यासाठी पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज ऑफ नर्सिंगची मदत झाली. साताऱ्यातील २० जिल्हा रुग्णालयांत कार्यरत ८६२ परिचारिकांना प्रशिक्षण दिले गेले आहे. नुकतेच रत्नागिरीतील ६० आशा आणि एएनएम परिचारिकांना डॉ. सलोनी राजे यांनी प्रशिक्षण दिले आहे. सातारा आणि रत्नागिरी येथील अधिकाऱ्यांनी फाउंडेशनला मोलाचे सहकार्य केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search