Next
कलमाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावीत यश
प्रेस रिलीज
Friday, June 22 | 03:16 PM
15 0 0
Share this story

पुणे : गणेशनगर आणि औंध येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलसह संस्थेच्या कन्नड माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीही माध्यमिक शालांत परीक्षेत (दहावी) नेत्रदीपक यश मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

गणेशनगर येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलमधील वैदेही कवठेकर हिने ९८.०२ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर इशा जहाँगीरदार ही विद्यार्थिनी ९६ टक्के गुण मिळवत दुसरी आली आहे. चिन्मय कार्लेकर आणि व्यंकटेश पै या विद्यार्थ्यांनी ९५ टक्के गुण मिळवले आहेत. चिन्मय कार्लेकर, रोहन दीडमिशे आणि रोहन दोशी यांना गणित विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले.   

औंध येथील डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या सानिया पेंढारी या विद्यार्थिनीने ९७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. सिद्धी केसकर (९६.८) आणि साहिल कलिंग (९५.२) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. पृथा चिंचोरे, तेजस खडके, इशान गुजराती यांनी गणितात, तर शर्वरी डावखरे हिने विज्ञान विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत.

डॉ. कलमाडी शामराव हायस्कूलच्या कन्नड माध्यमाच्या शाळेत श्राव्या कुलाल या विद्यार्थिनीने ९१.०८ टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक मिळवला आहे, मलिबिरादर भीमन गौडा हा विद्यार्थी ८५ टक्के गुणांसह दुसरा आला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link