Next
‘आयएमईडी’च्या प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Saturday, March 31, 2018 | 02:32 PM
15 0 0
Share this article:

पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंटच्या (आयएमईडी) प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या उपक्रमात सुमारे ९५हून अधिक विविध कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला.

यामध्ये गुगल, अ‍ॅमेझॉन, रिलायन्स इंडस्ट्रीज, ‘आयटीसी’, आदित्य बिर्ला, ‘आयसीआयसीआय’ सिक्युरिटीज, विप्रो, टेक महिंद्रा, बजाज अलियान्स, मोतीलाल ओसवाल आदी कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

‘२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ‘आयएमईडी’चे १६०हून अधिक विद्यार्थी संस्थेच्या ‘कार्पोरेट रिसोर्स सेल’ मधून विविध कंपन्यांमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ४८ लाख व देशपातळीवर १० ते १२ लाखांचे पॅकेज मिळाले आहे,’ अशी माहिती भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी दिली.

यशस्वी उद्योजक निर्माण करणे हे ब्रीद वाक्य असणार्‍या ‘आयएमईडी’मध्ये उच्चशिक्षणाला पोषक वातावरण, उत्तम शिक्षणपद्धती, उच्चशिक्षित शिक्षकवर्ग व विद्यार्थी हा केंद्रबिंदू असल्यामुळे या प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद मिळाला. काळाची गरज ओळखून अतिशय दूरदृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन ‘आयएमईडी’मध्ये केले जाते. यामध्ये इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशीप समीट, एचआर मिट, माजी विद्यार्थी मेळावा, कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन कार्यशाळा यांचा समावेश असल्याचे डॉ. वेर्णेकर यांनी सांगितले.

‘आयएमईडी’विषयी :
‘आयएमईडी’ला बिझनेस व मॅनेजमेंट क्रोनिकलकडून ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. भारत शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून भारतात ४०वे मानांकन, तसेच भारतातील व्यवस्थापन शास्त्रातील मानाच्या पहिल्या १० संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search