Next
रत्नागिरीतील विवेक सोहनी झाले आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच
दक्षिण महाराष्ट्रातील पहिला बहुमान
BOI
Wednesday, September 25, 2019 | 04:23 PM
15 0 0
Share this article:

विवेक सोहनीरत्नागिरी : रत्नागिरीतील विवेक सोहनी हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच झाले आहेत. जागतिक बुद्धिबळ संघटनेची प्रेसिडेंशिअल बोर्ड मीटिंग हंगेरी देशातील बुडापेस्ट येथे सात आणि आठ सप्टेंबरला झाली. त्या वेळी सोहनी यांच्या आंतरराष्ट्रीय पंच पदवीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अशी कामगिरी करणारे सोहनी हे दक्षिण महाराष्ट्रातील पहिलेच ठरले आहेत. 

‘चेसमेन, रत्नागिरी’ या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध जिल्हास्तरीय स्पर्धांमधून पंच म्हणून काम करत असताना विवेक यांना रत्नागिरीच्या चैतन्य भिडे यांनी राष्ट्रीय पंच परीक्षेस बसण्यासाठी प्रोत्साहन दिले. २०१६ साली नागपूर येथे झालेल्या या परीक्षेत उत्तीर्ण होऊन विवेक यांनी संपूर्ण देशात आठवा क्रमांक मिळवला. २०१७ साली दिल्ली येथे जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून घेण्यात आलेल्या फिडे आर्बिटर परीक्षेत विवेक यांनी अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये काम करता करता त्यांनी ‘फिडे आर्बिटर’ ही पदवीही मिळवली.

विवेक यांनी आर्बिटर्सकरिता उपयुक्त अशी तीन सॉफ्टवेअर्सही तयार केली आहेत. त्याबद्दल त्यांचे अनेक नामवंतांनी कौतुकही केले आहे. आंतरराष्ट्रीय पंच पदवीकरिता आवश्यक असलेले चार नॉर्म्स विवेक यांनी आयआयएफएल - मुंबई, आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर ओपन स्पर्धा, मेयर्स कप आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर ओपन स्पर्धा आणि गोव्याच्या ग्रँडमास्टर स्पर्धा यांमध्ये काम करून पूर्ण केले. या कामगिरीची दखलन घेऊ जागतिक बुद्धिबळ संघटनेने त्यांच्या आंतरराष्ट्रीय पंच (International Arbiter) या पदवीवर शिक्कामोर्तब केले. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत त्यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.

विवेक यांना या वाटचालीत रत्नागिरीचे बुद्धिबळ प्रशिक्षक चैतन्य भिडे आणि कोल्हापूरचे भरत चौगुले यांनी सुरुवातीपासूनच प्रोत्साहन दिले. पुण्याचे नितीन शेणवी व राजेंद्र शिदोरे, तसेच मुंबईचे विठ्ठल माधव यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. दिल्लीचे गोपाकुमार, नागपूरचे स्वप्नील बनसोड, चेन्नईचे आर. अनंतराम व आनंद बाबू आणि कर्नाटकचे वसंत बी. एच. यांच्याकडून विवेक यांनी पंच म्हणून काम करताना लागणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर, इलेक्ट्रॉनिक बोर्डस् सेटअप करण्यापासून त्यावरून चालू गेम्स इंटरनेटवर कसे ट्रान्समिट करावेत, अशा निरनिराळ्या तांत्रिक गोष्टी आत्मसात केल्या. 

अवघ्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत विवेक यांनी ५०हून अधिक आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये काम करून नावलौकिक मिळवला आहे. या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search