Next
‘गुजरात २०१७’ पुस्तकाचे १६ फेब्रुवारीला प्रकाशन
प्रेस रिलीज
Wednesday, February 14 | 02:50 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘डायमंड पब्लिकेशन प्रकाशित किशोर रक्ताटे आणि राजा कंदाळकर लिखित ‘गुजरात २०१७ चित्र, चरित्र, चारित्र्य’ या पुस्तकाचे प्रकाशन १६ फेब्रुवारीला होणार आहे. या वेळी खासदार व युवा काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव, आमदार व युवा भाजप प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, साम वाहिनीचे संपादक संजय आवटे उपस्थित राहतील,’ अशी माहिती ‘डायमंड’चे नीलेश पाष्टे यांनी दिली.

‘गुजरात २०१७ : चित्र, चरित्र, चारित्र्य’ या पुस्तकात गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीच्या काळातील घडलेल्या घटना लेखकद्वयींनी मांडल्या आहेत. पतंप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या दबदब्यामुळे गुजरातमधील निवडणुकीला विशेष महत्त्व होते. मोदी आणि शहा यांची प्रतिष्ठाच जणू या निवडणुकीत पणाला लागलेली होती. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या राज्याच्या निवडणुकीकडे लागले होते.

त्याच पार्श्‍वभूमीवर सामान्य माणसापासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत, कष्टकर्‍यांपासून ते अभ्यासकांपर्यंत या निवडणुकीचे काय पडसाद उमटत आहेत, निवडणुकीकडे कसे पाहत आहेत, राहुल गांधींच्या नेतृत्वाचा कसा ठसा उमटत आहे, उद्योन्मुख असणार्‍या नवनेतृत्वाची काय स्थिती आहे हे सर्व जवळून पाहणे, अभ्यासणे रोचक ठरणारे होते. किशोर रक्ताटे आणि राजा कंदाळकर यांनी या काळात गुजरातमध्ये ठाण मांडून निवडणुकीच्या बहुतांश पैलूंचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आणि हे पुस्तक साकार झाले.

प्रकाशनाविषयी :
दिवस : १६ फेब्रुवारी २०१८
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : पद्मजी हॉल, मराठा चेंबर्स, टिळक रोड, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link