Next
‘रेंटशेअर’चा पुण्यात विस्तार
प्रेस रिलीज
Tuesday, July 10, 2018 | 11:05 AM
15 0 0
Share this story

पुणे : ‘रेंटशेअर’ हे भारत व युएईमधील आघाडीच्या ऑनलाइन प्रॉडक्ट् रेंटल बाजारस्थळ मुंबई, हैद्राबाद, दिल्ली व दुबईमधील कार्यसंचालनांच्या यशस्वी प्रारंभानंतर सात नवीन शहरांमध्ये कार्यसंचालनाची सुरुवात करत आपल्या विस्तारात वाढ करत आहे.

रेंटशेअरने भारतातील पुणे, चेन्नई व कोचीन आणि युएईमधील शारजा व अबुधाबीमध्ये कार्यसंचालनांना सुरुवात केली आहे. रेंटशेअर या बाजारपेठांमध्ये सर्व इलेक्ट्रॉनिक्स, इव्हेंट्स व वैद्यकीय उत्पादने भाड्याने उपलब्ध करून देईल. डिजिटल बाजारपेठेमधील प्रमुख म्हणून रेंटल बाजारस्थळ रेंटशेअर भारत व युएईमधील १५ बिलियन युएस डॉलर्स बाजारपेठे असलेला ५-७ टक्के इलेक्ट्रॉनिक व इव्हेंट रेंटल विभाग संपादित करण्याचा प्रयत्न करणार आहे. कंपनी दोन आठवड्यांमध्ये सौदी अरेबिया या तिसऱ्या  देशामध्ये प्रवेश करणार आहे.

भारतातील रेंटशेअरचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष ढांड म्हणाले, ‘शेअरिंग पद्धतीला चालना मिळत असताना जगभरातील ग्राहक व पुरवठादारांसाठी सर्वोत्तम सुविधा देणे ही रेंटशेअरची मिशन आहे. मला खात्री आहे की आम्ही प्रवेश करत असलेल्या या नवीन शहरांमधील हजारो लोक भाड्याने पार्टी डेकोरेशन्सचा शोध घेत असतात; तसेच कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना उपकरणे देण्याचा प्रयत्न करतात. असे लोक किंवा कंपन्यांना एंड-टू-एंड स्ट्रिमलाइन सेवा मिळेल. २०१८ मध्ये भारत, गल्फ व मध्य पूर्वमधील देश येथे रेंटशेअरची उपस्थिती निर्माण करण्याची आमची योजना आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link