Next
पडघा केंद्रात मराठी राजभाषा दिन साजरा
BOI
Friday, March 01, 2019 | 05:54 PM
15 0 0
Share this story



भिवंडी : तालुक्यातील पडघा केंद्रातील समतानगर बोरिवली जिल्हा परिषद मराठी शाळा, बोरिवली जिल्हा परिषद शाळा उर्दू, बोरिवली आनंदनगर शाळा (आदिवासी पाडा) येथे ज्येष्ठ साहित्यिक कवीवर्य वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आणि मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून या दिवसाची सुरुवात केली. मराठी गोष्टींची पुस्तके वाचणे, शब्दांच्या भेंड्या या खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमंध्ये मराठी भाषेविषयी जागृती करण्यात आली.



या प्रसंगी कवी मिलिंद जाधव म्हणाले, ‘मराठी भाषेची अस्मिता जपण्यास ज्यांनी योगदान दिले आहे त्या थोर साहित्यिकांचा, समाजसुधारकांचा इतिहास विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा. मराठी अस्मितेचा झेंडा आपल्या सर्वांना शिखरावर नेऊन ठेवायचा आहे आणि ज्या मराठी मातीत आपण जन्माला आलो त्या मातीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा हे वाक्य बोलणे सार्थक ठरेल.’

या वेळी जाधव यांनी मराठी अस्मिता, मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय, मराठी मायबोली, संविधान, महाराष्ट्राची संस्कृती अशा विविध कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या. या वेळी पडघा केंद्रातील बोरिवली समतानगर मराठी शाळा, बोरिवली उर्दू शाळा, बोरिवली आनंदनगर शाळेत (आदिवासी पाडा) पडघा केंद्राचे केंद्र प्रमुख रमेश शेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळेत कार्यक्रम घेण्यात आले.


या वेळी मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, सहशिक्षिका स्वाती गिरी, मुख्याध्यापक क्वादीर शेख, मुख्याध्यापक बनाजी दरेकर, प्रकाश सोनावणे, शाहिस्ता शेख, मुशर्रत शेख, ताहिरा अन्सारी, नकिसा शेख यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व सांगून त्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ramesh About 18 Days ago
खूपच छाण लिखान
1
0

Select Language
Share Link