Next
‘सिंहगड’मध्ये दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात
प्रेस रिलीज
Monday, May 20, 2019 | 12:35 PM
15 0 0
Share this article:


कुसगाव : प्रवेश नियामक प्राधिकरण (अॅडमिशन रेग्युलेटरी अॅथोरिटी- एआरए) व राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (कॉमन एंट्रन्स टेस्ट- सीईटी) कक्ष यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया रूपरेषा ठरविण्यासाठी ‘एआरए’चे सचिव आनंद रायते यांच्या संकल्पनेतून आणि राज्य शासनाच्या विविध शैक्षणिक (अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, मत्स्य, दुग्ध व अन्य महाराष्ट्र शासन नियंत्रित) शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे नियोजन ‘सिंहगड’च्या लोणावळा कॅम्पसमध्ये करण्यात आले होते.

कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. प्रास्ताविक करताना सिंहगड लोणावळा कॅम्पसचे संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम एन नवले, सचिव डॉ. सुनंदा नवले व उपाध्यक्ष रोहित नवले, रचना नवले-अश्टेकर यांचे आभार व्यक्त करून या कार्यशाळेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. 


रायते यांनी उच्च शिक्षणामधील महाराष्ट्राचे स्थान अबाधित राखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे नमूद करत विद्यार्थीकेंद्रित व पालकांना सोयीची पडेल अशा प्रकारची प्रवेश व्यवस्था आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून एक खिडकी योजनेप्रमाणे नियोजन करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. 

या वेळेस ‘कल्पा-टेक पुणे’चे संचालक कमलाकर जोशी यांनी सेतू असिस्टड अॅडमिशन रजिस्ट्रेशन पोर्टल (एसएएआर) प्रणालीची माहिती ऑडिओ-व्हिज्युअल स्वरूपात दिली. या कार्यशाळेसाठी राज्य शासनाच्या शुल्क नियामक प्राधिकरणाचे सचिव माणिक गुरसाळ, प्रशासकीय अधिकारी जी. व्ही. धनीकर, तंत्रशिक्षण संचलनालयाचे उपसंचालक डॉ. राजीव शेटकर उपस्थित होते. कार्यशाळेसाठी सिंहगड संस्थेने १०० संगणक इंटरनेट कनेक्ट सुविधाचे प्रयोजन केले होते. या वेळी गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर आदी विभागांतून ५५० प्रतिनिधी हजर होते. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search