Next
‘मादाम तुसाँ’त आता ‘मस्तानी’ही...
दीपिका पदुकोणचाही मेणाचा पुतळा
BOI
Sunday, July 29 | 10:00 AM
15 0 0
Share this story

दिपिका पदुकोन

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत आपला एक तरी फोटो असावा, असे प्रत्येकालाच वाटत असते. अशा असंख्य चाहत्यांची इच्छा पूर्ण करणाऱ्या जगप्रसिद्ध मादाम तुसाँ या जगभरातील दिग्गजांच्या मेणाच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या संग्रहालयात आता बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पदुकोण हिचा पुतळाही उभारला जाणार आहे. 

‘बाजीराव मस्तानी’ या बॉलिवूडमधील सुपर-डुपर हिट चित्रपटात मस्तानीची भूमिका साकारलेल्या दीपिका पदुकोणचा हा मेणाचा पुतळा लंडनच्या विख्यात मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. या पुतळ्यासाठी सध्या तिच्या शरीराचे मोजमाप, त्वचेचा रंग, बोटांचे ठसे अशी सगळी माहिती घेतली जात आहे. ही माहिती घेतानाच्या काही खास क्षणांचे फोटो दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

‘लहानपणी आई-वडिलांसोबत जे संग्रहालय पाहिलं त्यात आपला पुतळा बसविण्यात येणार असल्यानं मी खूप उत्साहित आहे’, अशी प्रतिक्रिया दीपिकाने व्यक्त केली आहे. या पुतळ्याच्या उभारणीसाठी संग्रहालयाच्या एका टीमने दीपिकाची लंडनमध्ये नुकतीच भेट घेतली. त्या वेळी दीपिकाची तब्बल २०० मापं घेण्यात आली. पुतळा हुबेहूब बनवण्यासाठी अशा प्रकारे अत्यंत काटेकोरपणे त्या व्यक्तीचा अभ्यास करून  पुतळे बनविण्यात येतात. त्यामुळे या संग्रहालयाची कीर्ती जगभर पसरलेली आहे.

लवकरच दीपिकाचा शाहरूखबरोबर ‘झिरो’ हा चित्रपट येतोय. पुढच्या वर्षी दीपिकाच्या या पुतळ्याचे काम होणार असून, नंतर तो लंडन आणि दिल्लीतल्या संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. या संग्रहालयात चित्रपट अभिनेते, राजकारणी, समाजकारणी, शास्त्रज्ञ अशा प्रसिद्ध लोकांचे मेनाचे पुतळे आहेत. ते इतके हुबेहूब असतात, की त्या दोन व्यक्ती शेजारी उभ्या राहिल्या, तर पुतळा आणि व्यक्तीला ओळखतानाही गोंधळात पडायला होते, एवढा त्यात सारखेपणा असतो.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link