Next
राणी रासमणी
प्रेस रिलीज
Wednesday, May 29, 2019 | 10:43 AM
15 0 0
Share this article:

गंगेच्या अथांग प्रवाहाच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या हजारो खेड्यांपैकी एक कोना. या गावातील अकरा वर्षांची स्वच्छंदी मुलगी राणी रासमणी ठाकू माँबरोबर गंगेवर स्नानासाठी आलेली असताना तिच्या सौंदर्यावर राजचंद्राची नजर खिळते आणि दोघांची मने एकमेकांत गुंततात. ही गोष्ट राजचंद्राचे वडील प्रीतराम दास मार यांना कळल्यावर ते वेळ न दवडता व जातपात, गरीब-श्रीमंत यांचा विचार न करता त्यांच्या विवाहाचा निर्णय घेतात. 

राजमणी सोनपावलांनी मार हवेलीत येते. घरातील सर्वांना ती आपलेसे करते. राजा राममोहन रॉय यांच्या सल्ल्यानुसार राजचंद्र तिला शिक्षण देतात. व्यवहार शिकवतात. समाजातील दु:खी, गरिबांची ती राणी माँ होते. स्त्रियांच्या उद्धारासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या कार्यात मदत करते. राजचंद्राच्या निधनानंतरही राणी खंबीर, कणखर व लढाऊ वृत्तीने घरचा व्यापार सांभाळते. दक्षिणेश्वरीत काली माँचे मंदिर उभारते. इडन गार्डन, विविध मंदिरे व भव्य वास्तूंच्या उभारणीसाठी मदत करते. राणी माँची वास्तव कथा शुभांगी पाथरकर यांच्या ‘राणी रासमणी’तून वाचायला मिळते. अठराव्या-एकोणिसाव्या शतकातील समाजाचे चित्र यातून समजते.

पुस्तक : राणी रासमणी
लेखक : शुभांगी पाथरकर 
प्रकाशक : अनिकेत पराडकर
पाने : २९१
किंमत : ३५० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhyes About 113 Days ago
My heartfelt feeling ::-- may the book enjoy good sale . It is a very valuable addition to the books translated into Marathi . Hope , she continues the admirable efforts
0
0

Select Language
Share Link
 
Search