Next
जैवविविधता दिनानिमित्त विविध कार्यक्रम
एम्प्रेस गार्डनमध्ये दुर्मीळ देशी वाणांचे प्रदर्शन
BOI
Tuesday, May 21, 2019 | 03:28 PM
15 0 0
Share this article:


पुणे : आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त, २२ मे २०१९ रोजी ‘हिमालय ड्रग कंपनी’ आणि ‘सोसायटी फॉर एन्व्हायरमेंट अँड बायोडायव्हार्सिटी कॉन्झर्वेशन (एस. ई. बी. सी) यांच्या संयुक्त विद्यमाने एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनमध्ये वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हेरीटेज ट्री वॉक, दुर्मीळ देशी वाणांचे प्रदर्शन, व्याख्याने, छायाचित्र प्रदर्शन, निसर्गप्रेमींचा सत्कार आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

यामध्ये एम्प्रेस गार्डनसह स. प. महाविद्यालय, बृह्न महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बी. एम. सी. सी.), वाडिया कॉलेज, हेरीटेज इंडिया, वनसंशोधन, वन विभाग यांचा मोठा सहभाग आहे. निसर्ग प्रेमींसाठी नि:शुल्क प्रवेश आहे. एम्प्रेस गार्डनमधील विविध झाडांची माहिती देण्यासाठी सकाळी सात ते नऊ या वेळेत ‘हेरीटेज ट्री वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. 


देशी वाणांचे प्रदर्शन हे मुख्य आकर्षण असून, त्यात सहज उपलब्ध न होणाऱ्या व कमी माहिती असलेल्या तांदळाच्या १३ प्रकारच्या जाती, हळद, आले आदी विविध प्रकारची कंदमूळं, वेगवेगळ्या जातीची जांभळे, करवंदे, जंगली केळी, कोकम, टेंभुर्णी, सुपारी, नारळ, तसेच सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले वीस प्रकारचे आंबे, विविध प्रकारची जंगली फळं पहायला मिळणार आहेत. मसाल्याचे पदार्थ, मिरचीचे दहा प्रकारचे वाण, सह्याद्रीतील काही भागांत पारंपरिक पद्धतीने केली जाणारी २० प्रकारची लोणचीही या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. त्याशिवाय मधाचे विविध प्रकार, शास्त्रोक्त पद्धतीने मधमाशा पालन याबद्दल व्याख्यान, निसर्गाचे विविध अंगाने दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शनही पहायला मिळणार आहे.

या वेळी निसर्ग संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना संस्थेमार्फत पुरस्कृत करण्यात येणार आहे. त्यात प्रसिद्ध निसर्ग तज्ज्ञ प्रा. प्र. के घाणेकर, ‘टेल अस’ संस्थेचे लोकेश बापट आणि वृक्षमित्र रघुनाथ ढोले यांचा समावेश आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search