Next
‘डीकेटीई’तील २९ विद्यार्थ्यांची ‘वेलस्पन’मध्ये प्लेसमेंट
प्रेस रिलीज
Saturday, June 16, 2018 | 12:03 PM
15 0 0
Share this article:

‘वेल्सपन’ या नामांकित कंपनीत निवड झालेले ‘डीकेटीई’चे २९ विद्यार्थी.

इचलकरंजी : ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाईल विभागातील बी. टेक्स्टाईलच्या २९ विद्यार्थ्यांची जगप्रसिद्ध वेलस्पन इंडस्ट्रीमध्ये वार्षिक ३.२० लाख रुपये इतक्या वेतनावर प्लेसमेंट झाली आहे. ‘वेलस्पन’च्या वापी, अंजार, पालगाव व सिल्व्हासा येथील युनिटसाठी कंपनीने ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांची निवड केली. मागील वर्षीही २८ बी.टेक  विद्यार्थ्यांची येथे निवड झाली होती. सध्या हे विद्यार्थी कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.

‘वेलस्पन’ ही कंपनी टेरी टॉवेल, शिटिंग फॅब्रिक्स, नॉनवोव्हन फॅब्रिक्स, पॉलिस्टर, नायलॉन यार्न मॅन्युफॅक्चरिंग, यार्न डाइंग आदी विविध विभागांनी युक्त आहे. ‘वेलस्पन’ ही वस्त्रोद्योगातील विख्यात अशी कंपनी दरवर्षी ‘डीकेटीई’स भेट देते व विद्यार्थ्यांची निवड करते.  याही वर्षी ‘वेलस्पन’ कंपनीने रिटन टेस्ट, ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्ह्यू अशा विविध चार फेऱ्यांमधून विद्यार्थ्यांची बौद्धिक गुणवत्ता तपासली व एकूण २९ विद्यार्थ्यांचे कंपनीच्या विविध विभागामध्ये प्लेसमेंट केले.  

याशिवाय ‘डीकेटीई’मधील टेक्स्टाईलच्या आठ विद्यार्थ्यांची ‘वेल्सपन’ येथे विद्यावेतनसह उन्हाळी प्रशिक्षणसाठी निवड झाली आहे. ‘वेल्सपन’च्या स्पिनिंग आणि प्रोसेसिंग युनिटमध्ये विद्यार्थी संशोधन प्रकल्पावर काम करीत आहेत व त्यांना प्रीप्लेसमेंट ऑफर देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानाच जगभरातील विविध कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठविणारी व उत्तमोत्तम प्लेसमेंट करणारी ‘डीकेटीई’ ही संस्था देशात आघाडीवर आहे. शिक्षणाबरोबरच प्लेसमेंटबाबतही आज पालक आणि विद्यार्थी विचार करत असतात. या दोन्ही क्षेत्रात ‘डीकेटीई’ सर्वोत्तम कामगिरी करत आहे.

प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे ‘डीकेटीई’ संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एस. बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search