Next
चार क्षण निवांत घालवायचेत? वक्रतुंड कृषी पर्यटन केंद्रात जा...
प्रेस रिलीज
Friday, July 14, 2017 | 02:01 PM
15 0 0
Share this article:

पुणे : हल्लीच्या धावपळीच्या जगात आणि सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांना चार दिवस जरा निवांत निसर्गाच्या सान्निध्यात घालवता यावेत, म्हणून प्रत्येकच जण नवनव्या ठिकाणांच्या शोधात असतो. असेच एक अत्यंत रम्य आणि आपल्या मातीशी नाळ जोडून असलेले ठिकाण म्हणजे वक्रतुंड कृषी पर्यटन केंद्र. हे ठिकाण संपूर्ण कुटुंबासमवेत वेळ घालवता येण्याजोगे व पुण्यापासून केवळ ३५ किलोमीटर अंतरावर आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असणाऱ्या ‘धांगवडी’ या पुणे-सातारा रस्त्यावरील गावात हे कृषी पर्यटन केंद्र (अॅग्रो टुरिझम सेंटर) आहे. हल्लीच्या शहरी जीवनात गावाचा गोडवा अनुभवण्यासाठी या ग्रामीण सौंदर्याची अनुभूती आवर्जून घेता यावी अशा सोयी येथे करण्यात आल्या आहेत. येथे ‘वीकेंड’ घालवायला येणाऱ्यांसाठी राहण्याची व शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय आहे. एरव्ही चारचाकी व दुचाकी वाहनांच्या धुराला कंटाळलेल्या शहरवासीयांना येथे खास बैलगाडी आणि ट्रॅक्टरची राइड करायला मिळेल. भरपूर मोकळी जागा असल्याने क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, टग ऑफ वॉर, स्विमिंग, ट्रेकिंग, बॉनफायर आदींचाही आनंद येथे घेता येऊ शकतो.

वीकेंड ट्रिप्स, बर्थडे पार्टीज, हुरडा पार्टी, आखाड पार्टी, होळी, लहान कार्यक्रम यांसारख्या कारणांसाठी हे ठिकाण अगदी अनुरूप आहे. तसेच येथे डेस्टिनेशन वेडिंग, फॅमिली आउटिंग, ग्रुप बुकिंग, कंपनी बुकिंग आणि एका दिवसाची ट्रिप होऊ शकते. सध्या येथे ‘मान्सून ऑफर’ सुरू असून, प्रत्येकी केवळ एक हजार रुपयांमध्ये अमर्यादित जेवण (शाकाहारी/मांसाहारी), राहणे (एक रात्र मुक्काम) आणि सकाळचा नाष्टा मिळणार आहे. त्यातही पाच वर्षांखालील मुलांना व ग्रुप आल्यास डिस्काउंट मिळू शकेल.


अधिक माहितीसाठी :

फेसबुक : https://www.facebook.com/Vakratund-Agrotourism-1957897144422254/
वेबसाइट : vakratundagrotourism.net
ई-मेल : vakratundagrotourism@gmail.com
पत्ता : वक्रतुंड कृषी पर्यटन केंद्र
धांगवडी, पुणे सातारा रस्ता, राजगड ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर,
संकल्प सिद्धी रेस्टोरंट मागे, पुणे - ४१२२०६

उत्तम तनपुरे : ९०४९० ५४००३
अजित : ७५८८६ २४४४८
योगेश : ९०२८८ ४९७५०

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Nitin walje About
अति सुंदर 👌👌👌👌
0
0
Vishal Nandkumar Pasalkar About
खुपच छान आहे
1
0

Select Language
Share Link
 
Search