Next
‘मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनात ठसा उमटवावा’
सहयोगी अधिष्ठाता डॉ. हुकूमसिंग धाकड यांचे प्रतिपादन
BOI
Saturday, March 30, 2019 | 12:20 PM
15 0 0
Share this article:

पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन करताना सहयोगी अधिष्ठाता डॉ. हुकूमसिंह धाकड, अमर गायकवाड.

रत्नागिरी : ‘मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मत्स्यउद्योगामध्ये मोठे योगदान दिले आहे. ३९ वर्षे या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विविध निर्यात कंपनी, मत्स्यसंवर्धन आदी क्षेत्रांत कार्यरत आहेत. आता मत्स्य संवर्धनाबरोबरच मत्स्यबीज विक्री, प्रोबायोटिक्स विक्री, औषध विक्री आदी कंपन्यांमध्ये व्यवस्थापन क्षेत्रात मत्स्य पदवीधारकांना मोठी मागणी आहे. याच संधीचा वापर करून मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन क्षेत्रात मोठा ठसा उमटवावा,’ असे आवाहन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. हुकूमसिंह धाकड यांनी विद्यार्थ्यांना केले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ‘स्प्लॅश २०१९’ हे वार्षिक स्नेहसंमेलन २६ ते २८ मार्च २०१९ कालावधीत शिरगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हैदराबादच्या लीड पेन इंडिया सेल्स ऑफ पोल्ट्री फीडचे जनरल मॅनेजर अभिजीत शिंदे, रावनदा (आफ्रिका) येथील लेक किहू ऍक्वाकल्चर लिमिटेडचे फार्म मॅनेजर अमर गायकवाड उपस्थित होते.

सहयोगी अधिष्ठाता यांच्या हस्ते जनरल चॅम्पियनशिप स्वीकारताना तृतीय वर्षाचे विद्यार्थी.

अभिजीत शिंदे यांनी ‘मत्स्यखाद्य कंपनीतील व्यवस्थापन क्षेत्रातील नोकरीच्या संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना विस्तृतपणे मार्गदर्शन केले. अमर गायकवाड यांनी ‘मत्स्य उद्योगाची परदेशातील नोकरी आणि मत्स्य उद्योगाच्या संदर्भात उपलब्ध संधी’ या विषयावर सविस्तर माहिती देऊन मत्स्यसंवर्धन क्षेत्रातील मनुष्यबळाची मागणी विद्यार्थ्यांसमोर विशद केली.

स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी वरायटी इंटरटेनमेंट, दुसऱ्या दिवशी ‘&#३९;प्रियतमा&#३९’ हे दोन अंकी नाटक आणि तिसऱ्या दिवशी संगीत वाद्यवृंद असे कार्यक्रम झाले. विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. स्पर्धांचा निकाल अनुक्रमे प्रथम, द्वितीय असा : शॉट पुट (पुरुष)- मनीष मांडवकर, सिद्धांत उपस्कर, स्त्री- प्राची चव्हाण, साक्षी वेल्लाळ. डिस्कस थ्रो (पुरुष)- अजित बनसोडे, सागर तबिब, स्त्री- मानसी भोसले, सविता शिंदे. लाँग जंप (पुरुष)- तुषार कामाडी, प्रतीक यादव, स्त्री- साक्षी वेल्लाळ, मोनाली कोकाटे. चेस (पुरुष)- सागर तबिब, आदित्य जगझाप. कॅरम (पुरुष)- ओमकार कोडे, शुभम पवार, स्त्री- प्रणाली मेगा, मोनाली कोकाटे. बॅडमिंटन (पुरुष)- सिद्धांत उपस्कर, समीर डोंगरे, स्त्री- मोनाली कोकाटे, सुप्रिया मेश्रे. टेबल टेनिस (पुरुष)- पराग आचरेकर, पार्थ तावडे, स्त्री- वैष्णवी कोळवणकर, पूजा गमरे, टेबल टेनिस (डबल, पुरुष)- समीर डोंगरे आणि पार्थ तावडे, पराग आचरेकर आणि जीत म्हात्रे, स्त्री- पूजा गमरे आणि सुप्रिया मेश्रे, मोनाली कोकाटे आणि शमिका साळवी.

‘बेस्ट स्टुडंट ऑफ दी इयर’चा सन्मान स्वीकारताना अक्षया मयेकर

पारितोषिक वितरण समारंभामध्ये या वर्षाची जनरल चॅम्पियनशिप बीएफएसीच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी जिंकली. महाविद्यालयाचे वार्षिक पुरस्कार विजेते या प्रमाणे : राष्ट्रीय सेवा योजना बेस्ट स्टुडंट- प्रकाश पाटेकर, बेस्ट लायब्ररी यूजर- तेजस्विता कराळे आणि स्वराज रंधवा, बेस्ट कल्चरल स्टुडंट- सागर शिंदे, बेस्ट स्पोर्ट्स स्टुडंट-  शुभम मजिक, बेस्ट स्टुडंट ऑफ दी इयर- अक्षया मयेकर.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेया मयेकर यांनी केले. डॉ. दबीर पठाण यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ रंगकर्मी श्री. खरे, सेवानिवृत्त सहयोगी अधिष्ठाता डॉ. शेखर कोवळे, डॉ. विजय जोशी व डॉ. विजय निंबाळकर यांसह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search