Next
‘कांदानिर्यात अनुदान पुन्हा सुरू करून प्रलंबित रक्कम तातडीने द्यावी’
धनंजय मुंडे यांची विधान परिषदेत मागणी
प्रेस रिलीज
Saturday, June 22, 2019 | 03:21 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘लोकसभा निवडणुकीनंतर कांदा निर्यातीचे अनुदान बंद करण्यात आल्याने निर्यातीअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांद्याचे भाव कोसळून होणारे नुकसान टाळण्यासाठी हे अनुदान पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, तसेच प्रलंबित अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळावी,’ अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

शुक्रवार, २१ जून रोजी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित प्रश्नावरील चर्चेत सहभागी होताना धनंजय मुंडे यांनी कांदा निर्यातीचे अनुदान बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीकडे सरकारचे लक्ष वेधले.

ते म्हणाले, ‘कांद्याचे भाव आधीच कोसळले असून, खरीपाचा कांदा बाजारात आल्यावर ते आणखी कोसळतील. या नुकसानीत शेतकऱ्याला सावरणे कठीण होणार आहे. त्यामुळे कांद्याचे निर्यात अनुदान पूर्ववत करण्यात यावे. कांदा उत्पादकांना अनुदानाचा दुसरा टप्पा अजूनही मिळाला नाही. भविष्यात शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी बाजार हस्तक्षेप योजनेचे नियोजन करावे.’ 

‘सरकारकडून आंतरराज्य शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान दिले जाते; परंतु त्यासाठी असलेली अंतराची अट अव्यवहार्य आहे. परळी ते हैदराबाद अंतर साधारणपणे ३०० किलोमीटर आहे. आंतरराज्य मालवाहतुकीसाठी ७५० किमी अंतराची अट आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यासाठी अंतराची अट शिथील करण्यात यावी,’ अशी मागणीही मुंडे यांनी या वेळी केली.

या प्रश्नाला सहकारमंत्री सुभाष देशमुख, सहकार राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उत्तर दिले. २०० रुपयांचे थकीत अनुदान लवकरात लवकर देऊ, बाजार हस्तक्षेप योजना सुरू करण्याचा विचार करू, तसेच अंतरराज्य वाहतुकीसाठी अनुदानासाठी अंतराची मर्यादा अट ३०० किमी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search