Next
दुर्घटनाग्रस्तांच्या आपत्कालीन उपचारासाठी ‘आरवी एनकॉन’चा पुढाकार
सैफी हॉस्पिटलच्या सहयोगाने मोफत उपचार आणि सवलतीच्या दरात औषधे
प्रेस रिलीज
Friday, July 05, 2019 | 12:08 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : विविध दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या पीडितांना मोफत उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘आरवी एनकॉन’ने मुंबईतील सैफी हॉस्पिटलबरोबर भागीदारीची घोषणा केली. आउट पेशंट डिपार्टमेंटमधील (ओपीडी) कमी आवक असलेल्या समूहाच्या उपचारांसाठी तसेच इतर संबंधित सेवांसाठी कंपनीतर्फे दर वर्षी सहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा करार तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे.

या भागीदारीच्या माध्यमातून ‘आरवी एनकॉन’ सैफी हॉस्पिटलच्या फ्री ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आणि उपचारांसाठी पैसे पुरवेल. यामध्ये विशेषतः अशा लोकांचा समावेश होईल, जे आपत्कालीत परिस्थितीत येतील आणि ज्यांना चाचण्या, तपासण्या तसेच त्यांना लिहून दिलेल्या औषधांचा खर्च परवडत नसेल.

‘आरवी एनकॉन’ विशेष करून अशा रुग्णांचा खर्च भरून देईल, ज्यांचा मुंबईतील कोणत्या ना कोणत्या रेल्वे स्थानकांवर अपघात झाला असेल. यामध्ये चर्चगेट, मरीन लाइन्स, चर्निरोड आणि ग्रँटरोड यांसारख्या स्थानकांचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत एकूण १२ वैद्यकीय चाचण्या आणि त्यांची औषधेदेखील रुग्णांना सैफी हॉस्पिटलकडून सवलतीच्या दरात मिळतील व आरवी एनकॉन पात्र रुग्णांतर्फे त्याची भरपाई करून देईल. यामध्ये सीबीसी, ईएसआर, कोलेस्टेरॉल, ईसीजी आणि छातीचा एक्सरे आदींचा समावेश आहे.

आरवी एनकॉन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. डी. संघवी म्हणाले, ‘आरवी एनकॉनमध्ये आम्ही असे मानतो की, दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. पण बऱ्याचदा माहितीचा अभाव, मोठा खर्च आणि सुविधांचा अभाव या कारणांमुळे गरजू लोकांना अगदी आणीबाणीच्या वेळेतही मूलभूत हेल्थकेअर मिळत नाही. एका उदात्त उद्देशाने सैफी हॉस्पिटलसारख्या अत्यंत प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे आणि आम्हाला खात्री आहे की, या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना फायदा होईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search