Next
‘जनता बँके’च्या बिबवेवाडी शाखेचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Saturday, March 31, 2018 | 03:29 PM
15 0 0
Share this story

जनता सहकारी बँकेच्या बिबवेवाडी शाखेचे उद्घाटन करताना भरत अगरवाल. शेजारी जयंत काकतकर, संजय लेले, जगदीश कदम, नीलेश देशपांडे आदी मान्यवर.पुणे : बदलत्या काळानुरूप अत्याधुनिक बँकिंग सेवा देणाऱ्या पुण्यातील जनता सहकारी या मल्टीस्टेट शेड्युल बँकेच्या बिबवेवाडी शाखेचे उद्घाटन विश्वकर्मा इन्स्टिट्यूट समूहाचे भरत अगरवाल यांच्या हस्ते, तर येथील एटीएमचे उद्घाटन बँकेचे उपाध्यक्ष जगदीश कदम यांच्या हस्ते २८ मार्च २०१८ रोजी करण्यात आले.

बँकेची ही ७१वी शाखा आहे. या वेळी बँकेचे अध्यक्ष संजय लेले संचालक मंडळ सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत काकतकर आदी मान्यवर, ग्राहक आणि हितचिंतक मोठ्या संख्याने उपस्थित होते. जनता बँकेची बिबवेवाडी शाखा शॉप क्र. २४ ते २७, रासकर पॅलेस, तळमजला, सीटीएस क्र. ६९२, चिंतामणी नगर भाग शेजारी, हॉटेल जयपूर गार्डनसमोर, पुणे ४११ ०३७ येथे सुरू करण्यात आली असून, या शाखेच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यामध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, एनिवेअर बँकिंग, एनइएफटी, आरटीजीएस, विमा आदींचा समावेश आहे. या सेवा सुविधांचा या परिसरातील लाभ घ्यावा,’ असे आवाहन बँकेचे अध्यक्ष लेले यांनी या वेळी केले.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे, मान्यवर, खातेदार आणि हितचिंतकांचा बॅंकेतर्फे सत्कार करण्यात आला. काकतकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष कदम यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. विनय दुनाखे यांनी सूत्रसंचालन केले. बिबवेवाडी शाखेचे शाखाव्यवस्थापक निलेश देशपांडे यांनी आभार मानले. जनता सहकारी बँकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात सध्या ७१ शाखा कार्यरत असून, बँकेचा आज अखेरचा एकूण व्यवसाय सुमारे १४ हजार कोटींपेक्षा अधिक आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link