Next
रत्नागिरीत ‘लायन्स क्लब’तर्फे जलद चालण्याची स्पर्धा
BOI
Tuesday, October 30, 2018 | 01:24 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोरत्नागिरी : जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून चालण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०१८ रोजी भाट्ये समुद्र किनारी सकाळी सात ते आठ या वेळेत जलद चालण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे.

जागतिक मधुमेह दिन १४ नोव्हेंबरला साजरा केला जातो. सद्ध्या मधुमेहाविषयी जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत; मात्र मधुमेह नियंत्रण करण्यासाठी आहाराइतकेच व्यायामाला महत्त्व आहे. चालणे हा सर्वांत सहज, सोपा, विनाखर्चिक आणि सर्वांना करता येईल असा व्यायामप्रकार आहे. म्हणूनच जलद चालण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे.

ही स्पर्धा वय ४० ते ५० वर्षे, वय ५० ते ६० आणि ६० वर्षांवरील अशा तीन वयोगटांत होणार आहे. सर्व स्पर्धकांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी उपस्थित राहायचे असून, प्रत्येक स्पर्धकाला नोंदणी क्रमांक दिला जाईल. स्पर्धेची सुरुवात भाट्ये झरीविनायक मंदिर येथील समुद्र किनाऱ्यावर होईल. तेथून भाट्ये पुलाजवळील समुद्र किनाऱ्यापर्यंत चालत जाऊन परत फिरायचे आहे. पुन्हा झरीविनायक समुद्र किनारी आल्यावर तीन किलोमीटर अंतर पूर्ण होऊन ही स्पर्धा संपेल. स्पर्धा जलद चालण्याची असून, सहभागी स्पर्धक धावताना आढळल्यास आपोआप बाद होईल.

तिन्ही गटांतील अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना ८०० रुपये, ६०० आणि ४०० रुपयांचे रोख पारितोषिक आणि मेडल देऊन गौरविण्यात येईल; तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रशस्तीपत्र दिले जाईल. बक्षीस वितरण स्पर्धा संपल्यानंतर लगेचच होईल. या वेळी सर्व स्पर्धकांना अल्पोपहार देण्यात येईल.

स्पर्धेविषयी :
दिवस :
१५ नोव्हेंबर २०१८ रोजी
वेळ : सकाळी सात ते आठ
स्थळ : भाट्ये समुद्र किनारा, रत्नागिरी.
नाव नोंदणीसाठी संपर्क : ९४२२३ ९११६६, ९४२१२ ३२४९१.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search