Next
‘स्केटआर्ट’द्वारे कलात्मक स्केटिंगचे सादरीकरण
BOI
Tuesday, July 16, 2019 | 05:05 PM
15 0 0
Share this article:


पुणे : स्केटिंग आणि नृत्याचे प्रकार यांचा अभिनव संगम असलेला ‘स्केटआर्ट’ हा अनोखा कार्यक्रम येत्या शनिवारी, २० जुलै रोजी डॉ. शामराव कलमाडी शाळेमधील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहामध्ये सायंकाळी ६.३० वाजता  होणार आहे. प्रख्यात स्केटिंग प्रशिक्षक मेघना जुवेकर आणि त्यांच्या शिष्या व ओडिसी नृत्यांगना कंचन मुसमाडे यांनी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम आहे.

मेघना जुवेकर व कंचन मुसमाडे

याबाबत अधिक माहिती देताना मेघना जुवेकर म्हणाल्या, ‘आर्टिस्टिक रोलर स्केटिंग हा क्रीडा प्रकार सर्वसामान्य लोकांना माहीत व्हावा व अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून प्रेरणा मिळून नवीन खेळाडू घडावेत, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्केटिंगचे विविध प्रकार शास्त्रीय, पाश्चिमात्य, तसेच फ्युजन नृत्य प्रकारात सादर केले जाणार आहेत. ‘टेक्निकल आर्टिस्टिक स्केटिंग’ला जेवढी मिळायला हवी तेवढी मान्यता मिळालेली नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करण्याइतकी गुणवत्ता असूनही केवळ पायाभूत सुविधा नसल्याने या क्रीडाप्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे. ‘स्केटआर्ट’च्या माध्यमातून या क्रीडाप्रकाराला लोकप्रियता मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.’

‘कलात्मक स्केटिंगचे प्रेसीजन, क्वॉर्टर, कम्पलसरी आणि फ्री हे प्रकार शास्त्रीय, उप शास्त्रीय, पाश्चिमात्य, तसेच फ्युजन प्रकारातील नृत्यांच्या माध्यमातून पेश केले जाणार असून, या कार्यक्रमात नऊ ते २६ वर्षे वयोगटातील मुले-मुली सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नृत्यांगना अनुराधा गांधी (ओडिसी), सई ओगले (कथक) आणि तेजस गर्भे (पाश्चिमात्य) यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे,’ असेही जुवेकर यांनी स्पष्ट केले.

मेघना जुवेकर या स्केटिंगच्या आंतरराष्ट्रीय परीक्षक असून, राष्ट्रीय स्केटिंग तंत्रज्ञ समितीच्या सभासद आहेत. त्यांच्या शिष्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या कंचन मुसमाडे या राष्ट्रीय स्तरावरील उत्तम स्केटिंगपटू असून, ओडिसी नृत्यात पारंगत आहेत.

कार्यक्रमाविषयी :

कलात्मक स्केटिंग
स्थळ :  शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह, डॉ. शामराव कलमाडी स्कूल, एरंडवणे  
दिवस व वेळ : शनिवार,२० जुलै २०१९, सायंकाळी : ६.३० वाजता. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search