Next
‘होंडा’तर्फे पुणेकरांना मतदान करण्याचे आवाहन
प्रेस रिलीज
Friday, April 19, 2019 | 04:50 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’तर्फे ‘अक्टिव्ह इंडिया’ चळवळ उभारण्यात आली असून, या माध्यमातून पुण्यातील प्रत्येक मतदाराला त्यांच्या अभिव्यक्तीचा सर्वांत महत्त्वाचा हक्क बजावण्यासाठी, मतदान करण्यासाठी प्रेरित केले जात आहे. पुण्यातील सर्व मतदारांनी २३ एप्रिल २०१९ रोजी मतदान करण्याचे आवाहन या चळवळीतून केले जात आहे. 

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही प्रक्रियेत बऱ्याचदा वाहनांचा अभाव मोठा अडथळा ठरत असल्याने ‘होंडा’ने ‘कोणतीही सीट रिकामी राहाणार नाही’ (कोई सीट ना जाये खाली) नवा उपाय सुचवला आहे. पुण्यामध्ये दुचाकींची संख्या सर्वाधित असल्याने मतदान करायला जाताना तुमच्या दुचाकीची मागची सीट रिकामी राहाणार नाही याची खात्री करण्याचे आवाहन ‘होंडा’ने केले आहे. तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजारी अशा कोणालाही सोबत घ्या आणि प्रत्येक दुचाकी मतदान केंद्रावर दोन मते घेऊन जाईल, याची खात्री करा, असे ‘होंडा’तर्फे सांगण्यात आले आहे.

या विषयी बोलताना ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’चे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘भारताचा विश्वास जिंकल्यानंतर ‘होंडा’ आता सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आणि भारताला ‘अक्टिव्ह इंडिया’ बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ‘कोई सीट ना जाये खाली’ शपथेसह प्रेरणा घेऊन आम्ही पुण्यातील सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी चालना देत आहोतच, शिवाय आपल्यासोबत मित्रपरिवार, कुटुंबीय आणि नातेवाईकांना घेऊन जाण्याचे आवाहनही करत आहोत. हा उपक्रम सादर केल्यापासून आम्हाला फोन आणि संकेतस्थळाद्वारे जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. पुण्यातील मतदानाला केवळ चार दिवस उरले असताना, प्रत्येक मतदाराने सामाजिकदृष्ट्या जागरूक आणि बदल घडवण्यासाठी जास्त जबाबदार बना आणि ९८७०५ ००१११ या क्रमांकावर मिस कॉल देऊन मतदान करण्याची शपथ घेत ‘अक्टिव्ह इंडिया’ चळवळीला पाठिंबा द्या.’

‘अक्टिव्ह इंडिया’ ही ‘होंडा’ नेटवर्क टचपॉइंट्स, सर्व माध्यमांतील विपणन संवादाचा पाठिंबा असलेल्या कामांच्या ठिकाणांद्वारे अभियान राबवत सखोल जनजागरूकता घडवून आणत आहे. आतापर्यंत या चळवळीअंतर्गत दीड लाख नागरिकांनी शपथ घेतली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search