Next
‘नवजात बालकाच्या आरोग्यासाठी स्तनपान महत्त्वाचे’
‘लॅक्टेकॉन २०१८’ परिषदेत तज्ज्ञांचे मत
प्रेस रिलीज
Friday, August 17, 2018 | 03:55 PM
15 0 0
Share this story

‘लॅक्टेकॉन २०१८’ परिषदेच्या प्रमुख पाहुण्या गिरिजा ओक  यांच्यासह ‘पुणे ऑब्स्टेट्रीक्स अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटी’च्या अध्यक्षा डॉ. भारती ढोरे पाटील, क्लिनिकल सेक्रेटरी डॉ. मंगला वाणी,  डॉ. संजय गुप्ते व रॅम्पवॉकमध्ये सहभागी झालेल्या माता

पुणे : ‘बाळाच्या जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान करणे हे नवजात बालकाच्या आरोग्यासाठी चांगले असते आणि त्याचा बालकाच्या आरोग्यावर दीर्घकाळ उपयोग होतो’, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. ‘पुणे ऑब्स्टेट्रीक्स अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटी’ (पीओजीएस) तर्फे व ‘इंडियन अॅाकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’ यांच्या सहयोगाने जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने रविवारी, ‘लॅक्टेकॉन २०१८’ या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. 

या परिषदेत अभिनेत्री गिरिजा ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या वेळी ‘पुणे ऑब्स्टेट्रीक्स अँड गायनॅकोलॉजिकल सोसायटी’ (पीओजीएस) च्या अध्यक्षा डॉ. भारती ढोरे पाटील, क्लिनिकल सेक्रेटरी डॉ. मंगला वाणी, ‘पीओजीएस’चे माजी अध्यक्ष डॉ. संजय गुप्ते, उपाध्यक्ष डॉ. आशिष काळे, कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. पंकज सरोदे, सरसचिव डॉ. मिलिंद दुगड, खजिनदार डॉ. माधव कणकवले याबरोबरच ‘इंडियन अॅ्कॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स’चे प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. संजय मानकर, ‘बीपीएनआय’चे महाराष्ट्राचे समन्वयक डॉ. प्रशांत गंगल आदी मान्यवर उपस्थित होते. 

यानिमित्ताने एका रॅम्पवॉकचे देखील आयोजन करण्यात आले होते,ज्यामध्ये मातांनी सहभाग घेतला होता.

या वेळी गिरिजा ओक म्हणाल्या, ‘स्तनपान आणि त्याच्या फायद्यांविषयी मातांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला हवा. यासाठी कुटूंबाकडून अधिक पाठिंब्याची गरज असते. स्तनपानासाठी ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी. याकरिता आपण चांगले उपाय आणि मदत पुरविली पाहिजे. स्तनपानाच्या महत्त्वाविषयी जागरूकता सर्वांमध्ये निर्माण करण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे.’

‘पीओजीएस’च्या क्लिनिकल सेक्रेटरी डॉ. मंगला वाणी म्हणाल्या, ‘माता व बाळाचा पहिल्या एका तासात एकमेकांच्या त्वचेशी संपर्क होणे हे नवजात बालकाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, तसे न झाल्यास बाळाला भविष्यात अनेक जोखमींचा सामना करावा लागू शकतो. प्रसूतीतज्ञ स्तनपानाविषयी जागरूकता निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत  आहे.’

डॉ. मिलिंद दुगड म्हणाले, ‘दुग्धपान आणि स्तनपानाला आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात अधिकधिक महत्त्व मिळण्याची गरज  आहे. यावर्षीची ‘पीओजीएस’ची संकल्पना ‘जस्ट केअर फॉर हर’ ही आहे. या संकल्पनेला पूरक असे कार्यक्रम आम्ही हाती घेतले आहेत.‘पीओजीएस’चे अॅप विकसित केले असून,  स्पेक्युलम न्युजलेटर देखील पुन: सादर केले आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Leena s . Pawar About 181 Days ago
Wonderful. Best wishes for further prog.
0
0

Select Language
Share Link