Next
‘मोलकरीण बाई’ मालिकेचे १०० भाग पूर्ण
प्रेस रिलीज
Friday, July 19, 2019 | 05:07 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेने १०० भाग पूर्ण केल्याबद्दल कलाकारांनी सेटवर केक कापून आनंद साजरा केला. रिअल लोकेशनवर या मालिकेचे चित्रीकरण केले जात असल्यामुळे खऱ्याखुऱ्या वस्तीत हा आनंद साजरा करण्यात आला. 

‘मोलकरीण बाई’ ही मालिका सोमवार ते शनिवार या कालावधीत सायंकाळी ६.३० वाजता प्रसारित केली जाते. या मालिकेत अनिताची भूमिका साकारणाऱ्या सारिला निलाटकर यांनी या प्रसंगी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘मालिकेचे १०० भाग कधी पूर्ण झाले कळलेच नाही. या मालिकेच्या निमित्ताने आमचे छान कुटुंब तयार झाले आहे. प्रत्येकालाच एकमेकांच्या आवडी-निवडी, सवयी माहिती आहेत. पडद्यामागची हीच केमिस्ट्री सीनमध्येही दिसून येते. या मालिकेने यशाचा असाच टप्पा पार करत राहावा.’

‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या आजवरच्या प्रवासात प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यापुढील प्रवासही तितकाच रंजक आणि उत्कंठावर्धक असणार आहे. सध्या मालिकेत अनिताची बहिण रंजना अनिताच्या संसारात विष कालवण्याचा प्रयत्न करतेय. अनिता यावर कशी मात करणार, हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search