Next
‘चंद्रा फाउंडेशन’तर्फे ‘देश का सच’ डिजिटल उपक्रम सादर
प्रेस रिलीज
Wednesday, October 10, 2018 | 11:05 AM
15 0 0
Share this story

पुणे : नागरिकांना त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठीचा प्रयत्न म्हणून सुभाष चंद्रा (SACH) फाउंडेशनने गांधी जयंतीनिमित्त ‘देश का सच’ हा पहिलाच डिजिटल उपक्रम सादर केला आहे. नागरिकांसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न आणि मुद्दे ऐरणीवर आणण्यासाठी त्यांना एक सामाजिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुभाष चंद्रा यांनी ही संकल्पना मांडली होती. यातून तयार झालेले ‘देश का सच’ हे जनहित याचिकांसाठीचे एक थांबा व्यासपीठ असणार आहे.

सार्वजनिक प्रश्नांबद्दल सजग असलेले आणि सकारात्मक बदल घडवून आणू इच्छिणारे नागरिक इथे याचिका दाखल करू शकतात किंवा इतर याचिकांना पाठिंबा देऊ शकतात. १० हजारांहून अधिक लोकांचा पाठिंबा असलेल्या याचिकांमध्ये सुभाष चंद्रा स्वत: लक्ष घालणार असून, हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नही करणार आहेत.

सुभाष चंद्राया व्यासपीठाबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट करताना एसएसीएच या आपल्या सामाजिक कार्य विभागाचे प्रतिनिधी म्हणून सुभाष चंद्रा म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत, आपल्या समाजाला भेडसावत असणाऱ्या रूढी आणि प्रश्नांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी मी छोट्या व मोठ्या पडद्याचा वापर केला आहे; मात्र या महान देशाचा एक नागरिक म्हणून माझा ठाम विश्वास आहे की देशाला अधिक महान बनवणे आणि देशाचा विकास करणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. ‘देश का सच’ हा प्रत्येक नागरिकाला भेडसावणारे प्रश्न आणि त्यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकांना एकत्र आणणे आणि त्यांना एकमेकांना मदत करणे शक्य होईल हे पाहणे, हा आमचा प्रयत्न आहे. हा देश आपला आहे आणि म्हणूनच जबाबदारीही आपली आहे, या क्रांतीच्या मार्गावर पाऊल ठेवत नागरिक हे माध्यम वापरतील, अशी मला आशा आहे.’

या उपक्रमासाठीची प्रेरणा ‘वैष्णव जन तो’ या अत्यंत प्रसिद्ध भजनावरून घेण्यात आली आहे. प्रख्यात संगीतकार अमित त्रिवेदी आणि लोकप्रिय गायिका जोनिता गांधी यांनी या भजनाला दिलेल्या सुरेल नव्या रूपासह हा उपक्रम सादर करण्यात आला. १५व्या शतकातील संतकवी नरसी मेहता यांनी लिहिलेले, समानता, इतरांचा मान ठेवणे आणि संकटात असलेल्यांची मदत करणे यावर भर देणारे हे भजन अगदी आज २१व्या शतकातही अर्थपूर्ण ठरत आहे.

वेबसाइट : www.deshkasach.in
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link