Next
डॉ. दातार ‘यूएई’तील श्रीमंत भारतीयांच्या यादीत १८वे
प्रेस रिलीज
Friday, November 30, 2018 | 03:56 PM
15 0 0
Share this story

डॉ. धनंजय दातारपुणे : ‘अल अदील ट्रेडिंग’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय दातार यांना ‘अरेबियन बिझनेस’तर्फे संयुक्त अरब अमिरातीतील (यूएई) सर्वांत श्रीमंत भारतीयांच्या यादीत २०१८ वर्षासाठी १८ वे मानांकन देऊन गौरवण्यात आले आहे. या यादीत समावेश असलेले डॉ. दातार हे एकमेव महाराष्ट्रीय उद्योजक आहेत.

‘मसालाकिंग’ या नावाने ओळखले जाणारे डॉ. दातार म्हणाले, ‘अरेबियन बिझनेस हे जगातील अत्यंत विश्वसनीय माध्यमांपैकी एक असून, त्यांनी अरब विभागातील प्रगतीप्रती माझ्या आकांक्षेची व योगदानाची दखल घेऊन मला मानांकन दिले आहे. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. या यादीत नावाची नोंद करण्यामागे अशा ताकदवान व प्रभावी भारतीय नेतृत्वांचा गौरव करण्याचा हेतू आहे, जे आपला दृष्टीकोन व गुंतवणूक यांच्या माध्यमातून अरब जगताला आकार देत आहेत. या कर्तृत्ववान भारतीय उद्योजकांनी आपली दूरदृष्टी, अस्सलता व चमकदार नेतृत्वाचा वापर करून आपल्या भागधारकांसाठी, तसेच अर्थव्यवस्थांसाठी भांडवल निर्मिती करून पश्चिम आशियात अत्यंत यशस्वी कंपन्या स्थापन केल्या आहेत. हे मानांकन म्हणजे अरब जगतात वास्तव्यास असलेल्या किंवा व्यवसाय चालवणाऱ्या भारतीय व्यावसायिकांचे सखोल संशोधन व विश्लेषण यांचे फलित आहे.’

‘पुरस्कार व गौरव आपण करत असलेल्या कार्याची जबाबदारी वाढवतात. आम्हीही सामाजिक जबाबदारीचे भान ठेऊन आमच्या ग्राहकांना वर्धित मूल्य मिळवून देण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहू, मला मिळालेला सन्मान हे आमच्या संपूर्ण संघटनेच्या समर्पित सांघिक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. आमच्या प्रयत्नांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीच्या शासकांचाही मी आभारी आहे. या यादीतील बहुसंख्य आघाडीचे उद्योजक व व्यवसाय मालक हे संयुक्त अरब अमिरातीतील आहेत. यावरूनच आम्हाला येथील नेतृत्वाकडून मिळत असलेल्या पाठबळाचा स्पष्ट प्रत्यय येतो,’ असे डॉ. दातार यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link