Next
‘डीकेटीई’चा बांगलादेशमधील विद्यापीठांसोबत सामंजस्य करार
प्रेस रिलीज
Monday, December 10, 2018 | 05:02 PM
15 0 0
Share this article:इचलकरंजी : येथील डीकेटीईने बांगलादेशमधील नॉर्दन युनिर्व्हसिटी बीजीएमईए युनिर्व्हसिटी ऑफ फॅशन अ‍ॅंड टेक्नॉलॉजी यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे डीकेटीई इन्स्टिट्यूट व या दोन्ही विद्यापीठांशी शिक्षण आणि संशोधनाबाबत आदानप्रदान केले जाणार आहे. संशोधनातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लावणे हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन यापूर्वी डीकेटीईने १९ नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत.  

बांगलादेशमध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. जागतिक पातळीवर वस्त्रोद्योग केंद्र म्हणून बांगलादेश उदयास येत आहे. त्यामुळे तेथून शैक्षणिक, औद्योगिक, प्लेसमेंटस, अ‍ॅडमिशन या संबंधित सेवा देण्यासाठी डीकेटीईला निमंत्रित केले जात होते. डीकेटीईचे डायरेक्टर डॉ. पी. व्ही. कडोले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बांगलादेश येथे नुकतीच भेट दिली. नॉर्थन युनिर्व्हसिटी व बीजीएमईए युनिर्व्हसिटी ही तेथील नावाजलेली विद्यापीठे असून, त्यांच्या बांगलादेशात विविध शाखा आहेत. दोन्ही विद्यापीठात अभियांत्रिकीसोबतच फार्मसी, कला, कायदा यांचेही अभ्यासक्रम आहे.या भेटीवेळी डीकेटीईचा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कार्याचा आढावा घेतल्यानंतर नॉर्दन विद्यापीठाचे व्हाइस चान्सलर यांच्याशी चर्चा करून डीकेटीईसमोर कराराचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर टेक्स्टाइल इंजिनीअरिंगसाठी नॉर्दन विद्यापीठ व डीकेटीईमध्ये कराराचे आदान प्रदान झाले. यात सेमिस्टर एक्स्चेंजअंतर्गत बांगलादेशचे पाच विद्यार्थी २०१९-२० पासून डीकेटीई येथे प्रवेश घेणार असून, तेथील क्रेडीट विद्यार्थ्यांच्या येथील मार्कशीटमध्ये समाविष्ट करण्यात येतील. नॉर्दन विद्यापीठातील प्राध्यापकदेखील डीकेटीईला भेट देणार असून, बीटेक पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डीकेटीई येथे एमटेक करण्यासाठी प्राधान्य मिळणार आहे. विद्यार्थी, प्राध्यापक यांना नॉर्दन विद्यापीठ येथे अ‍ॅडव्हान्सड रिसर्च लॅबोरेटरीजवर संशोधन करणे शक्य होणार आहे.  

डीकेटीईच्या प्रतिनिधींनी बीजीएमईए युनिर्व्हसिटी ऑफ फॅशन अ‍ॅंड टेक्नॉलॉजी विद्यापीठास भेट दिली. एक्सपोर्ट ओरिएंटेड रेडिमेड गारमेंटसाठी लागणारे कुशल मनुष्यबळाला अद्ययावत प्रशिक्षण देणारे व पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण देणारे हे विद्यापीठ आहे. तेथील टेक्स्टाइल कार्याचा विस्तार व गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी डीकेटीईशी सामंजस्य करार केला. यात स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रामअंतर्गत बीजीएमईएमधील विद्यार्थी डीकेटीई येथे शिक्षण संपादन करतील. याव्यतिरिक्त संयुक्तपणे पेटंट, संयुक्तपणे कार्यशाळा इंडस्ट्रीयल संशोधन, संयुक्त सेमिनार्स अशा विविध मुद्यांचा या करारामध्ये समावेश आहे. पीएचडीसाठी बीजीएमईए येथील प्राध्यापकांना डीकेटीईत प्राधान्य मिळेल.

या सामंजस्य करारावेळी प्राध्यापक, उद्योजक, मोठया संख्येने उपस्थित होते. यासाठी डीकेटीईचे हितचिंतक श्री. रमाणी व सौम्या चौधरी यांनी सहकार्य केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search