Next
प्रशांत दळवी
BOI
Thursday, December 07 | 04:00 AM
15 0 0
Share this story

‘चारचौघी’ या गाजलेल्या नाटकाचे दोन अंक पाहून डॉ. श्रीराम लागूंनी ज्यांच्या लिखाणाबद्दल,’ हे लिखाण मला युजीन ओनीलच्या लिखाणाची आठवण करून देतं,’ असे गौरवोद्गार काढले होते, ते अतिशय सकस लेखन करणारे नाटककर प्रशांत दळवी यांचा सात डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
................
सात डिसेंबर १९६१ रोजी मुंबईमध्ये जन्मलेले आणि औरंगाबादमध्ये वाढलेले प्रशांत दळवी हे आजच्या प्रमुख नाटककारांपैकी एक. ते सिनेमाच्या कथाही लिहित असतात. एकांकिका लिहून नाट्यलेखनाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी ‘पौगंड’, ‘दगड का माती’ यांसारखी वेगळ्या धाटणीची नाटकं लिहिली आणि मुंबईला आल्यावर मात्र त्यांनी आपल्या ‘चारचौघी’सारख्या अत्यंत चाकोरीबाहेरच्या आणि एकुणातच विवाहसंस्थेबद्दल अनेकांना गंभीर विचार करायला भाग पाडणाऱ्या नाटकाने स्वतःची अशी खास जागा निर्माण केली. 

औरंगाबाद विद्यापीठातून त्यांनी नाट्यशास्त्राची पदवी घेतली आहे. नाटककार म्हणून त्यांची ताकद मोठी आहे. डॉ. लागूंनी त्यांच्या ‘चारचौघी’चे दोन अंक पाहून म्हटलं होतं, ‘प्रशांत दळवींचे हे दोन अंक मला युजीन ओनीलच्या लिखाणाची आठवण करून देतात!’

ते ‘युक्रांद’सारख्या चळवळीशीही निगडीत होते. विख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याबरोबर त्यांचं उत्तम ट्युनिंग जुळलेलं दिसतं. त्यांनी त्यांच्याबरोबर काही वर्षं औरंगाबादमध्ये ‘जिगीषा’ संस्थेद्वारा नाट्यचळवळ चालवली होती. त्यांचे वडील बंधू प्रसिद्ध नाटककार अजित दळवी हे ही त्या संस्थेत होते. त्यांनी मिळून ‘बिनधास्त’ हा सर्वस्वी अनोख्या धाटणीचा, बहुतांशी स्त्रियांच्याच भूमिका असणारा सिनेमा तयार केला होता आणि तो प्रचंड गाजला होता. त्यांच्या या ग्रुपमधलीच बरीच मंडळी सिनेमात सक्रीय आहेत; मात्र तद्दन व्यावसायिक धंदेवाईक मसाला सिनेमे न बनवता काहीतरी वैचारिक नक्कीच देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 

ध्यानीमनी, चाहूल, गेट वेल सून, सेलिब्रेशन अशी दळवी यांची नाटकं प्रसिद्ध आहेत. 

(प्रशांत दळवी यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link