Next
पं. नारायणराव बोडस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘स्वरपुष्पार्पण’
प्रेस रिलीज
Friday, March 16 | 11:42 AM
15 0 0
Share this story

पं. केदार बोडस
पुणे :  ग्वाल्हेर - आग्रा घराण्याचे प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. नारायणराव बोडस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येत्या रविवारी, १८ मार्च रोजी ‘स्वरपुष्पार्पण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी साडे चार  वाजता हा  कार्यक्रम होणार असून, तो सर्वांसाठी खुला आणि विनामूल्य आहे.

 बहाउद्दीन डागरपं. नारायणराव बोडस यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अत्यंत महत्त्वाचे योगदान असून अनेक अनवट रागरागिणी ते गात असत. कार्यक्रमाची सुरूवात जयपूर घराण्याच्या गीता गुलवडी यांच्या गायनाने होणार आहे. त्यानंतर धृपद- धमारमधील डागुरबानी घराण्याचे उस्ताद बहाऊद्दीन डागर यांचे रुद्रवीणा वादन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. बहाउद्दीन डागर हे ज्येष्ठ धृपद धमार गायक व रुद्रवीणा वादक झिया मोहिउद्दीन डागर यांचे पुत्र आहेत. त्यानंतर लखनऊ घराण्याच्या सोनाली चक्रवर्ती (कथक), आग्रा घराण्याच्या लीला नरवणे (गायन), ग्वाल्हेर- आग्रा -जयपूर- भेंडीबाजार घराण्याचे गायक व पं नारायणराव बोडस यांचे  पुत्र पं. केदार बोडस (गायन), डागुरबानी घराण्याचे पं. पुष्पराज कोष्टी (सूरबहार) आपली कला सादर करणार आहेत.      
 
त्यांना दत्तात्रय भावे, प्रदीप सरदेसाई, श्रीपाद गोडसे (तबला), सुखद मुंडे (पखावज),  संजय गोगटे, लीलाधार चक्रदेव, सौमित्र क्षीरसागर (संवादिनी), सतविंदर पाल सिंग (सारंगी), केदार केळकर (गायन) , रसिका भावे (पढंत), नितीश पुरोहित (सरोद), अझरूद्दीन शेख (बासरी), प्रणय सकपाळ (मंजिरा) हे साथसंगत करणार आहेत.

कार्यक्रमाविषयी :
‘स्वरपुष्पार्पण’
स्थळ : पं. जवाहरलाल सांस्कृतिक भवन, घोले रस्ता,  शिवाजीनगर 
वेळ : सायंकाळी ४.३० वाजता 

(हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link