Next
रत्नागिरी जिल्हा माजी सैनिक संघटनेची आढावा बैठक
BOI
Wednesday, June 12, 2019 | 11:14 AM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : जिल्हा माजी सैनिक संघटनेची जिल्हास्तरीय वार्षिक आढावा बैठक नऊ जून २०१९ रोजी शहरातील मराठा भवन सभागृहात झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थान दापोली येथील माजी सैनिक सय्यद देशमुख यांनी भूषविले. 

जिल्हा संस्थेचे अध्यक्ष सुभाष सावंत व सचिव शंकर मिलके यांनी प्रमुख अतिथी व मान्यवरांचे स्वागत केले. शहीद सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली. प्रास्ताविक करताना मिलके यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला; तसेच सन १९८८मध्ये जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना एकत्रित आणण्यासाठी (नियोजित) गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. शासनाच्या माजी सैनिकांसाठीच्या कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकत्र येऊन शासनाकडे आपल्या स्तरावरून वेळोवेळी पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.

जिल्हा संस्थेचे अध्यक्ष सावंत यांनी संस्थेने माजी सैनिकांच्या समस्यांचे निराकरण कशा प्रकारे केले याची माहिती देऊन अद्याप प्रलंबित असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे सांगितले. 

सभेचे अध्यक्ष माजी सैनिक देशमुख यांनी माजी सैनिकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. या बैठकीत सुमारे २२ अतिमहत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. बैठकीला जिल्हाभरातून सुमारे ७० माजी सैनिक प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी माजी सैनिकांच्या विधवा, वीरपत्नींच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. यापैकी काही अडचणी यापूर्वीच जिल्हा संस्थेच्या माध्यमातून सोडविल्या असून, काही अडचणी सोडविण्यासाठी संबंधित खात्याशी पत्रव्यवहार चालू असल्याचे सांगण्यात आले. 

आजी-माजी सैनिकांनी तसेच वीरमाता, वीरपत्नी यांनी त्यांच्या अडीअडचणी व समस्यांच्या निराकरणासाठी तालुका व जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे संपर्क साधण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. शासकीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना प्रलंबित कामांसंदर्भात निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. जास्तीत जास्त सभासद नोंदणी व तालुकावार संघटना बांधून जिल्हा संघटना बळकट करण्याचा संकल्प बैठकीत सोडण्यात आला. शिवाय माजी सैनिकांच्या अनेक प्रलंबित समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह अन्य खात्यांचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बैठका आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.

या वेळी अध्यक्ष सावंत, सचिव मिलके यांच्यासह नंदकुमार शिंदे, मोहन सातव, नवनाथ साळवी, अमर चाळके, प्रवीण पावसकर, वासुदेव घाग, एकनाथ सपकाळ, संदीप होळकर, समीर शेख, श्री. मांडवकर, अरविंद आठल्ये, पत्रकार दिलीप जाधव व व माजी सैनिक जिल्हा संघटना व तालुका संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सातव यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search