Next
र्‍हिदम वाघोलीकर यांना ‘महात्मा गांधी सन्मान’ प्रदान
लंडनच्या ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये गौरव
प्रेस रिलीज
Saturday, October 27, 2018 | 01:11 PM
15 0 0
Share this article:



पुणे : युवा लेखक र्‍हिदम वाघोलीकर यांना लंडनमधील ‘हाउस ऑफ कॉमन्स’ येथे झालेल्या ग्लोबल अचिव्हर्स कॉनक्लेव्हमध्ये ‘महात्मा गांधी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.

‘एनआरआय वेल्फेअर सोसायटी ऑफ इंडिया’ (लंडन) संस्थेतर्फे पुरस्कार वितरण करण्यात आले. जगभरातून ४५ नागरिकांना हा सन्मान दिला जातो. हा पुरस्कार मिळविणारे वाघोलीकर हे सर्वात तरुण भारतीय आहेत. हा पुरस्कार २५ ऑक्टोबर २०१८ रोजी देण्यात आला. या वेळी भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, पद्मविभूषण डॉ. अनिल कोहली आणि मान्यवरांना गौरविण्यात आले. या वेळी वाघोलीकर यांचे वडील सुधीर यांसह भारत व इंग्लंडमधील मान्यवर उपस्थित होते.

‘या सन्मानामुळे भारताचा झेंडा ‘हाउस ऑफ कॉमन्स’मध्ये उंचावल्याचा आनंद वाटतो’, असे वाघोलीकर यांनी सांगितले.

वाघोलीकर हे सामाजिक विषयांवर जनजागृतीचे काम करणाऱ्या ‘क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत. गौरी सावंत यांच्यासमवेत ते अनाथ मुलींसाठी काम करतात. त्यांनी लता मंगेशकर यांच्यावर ‘स्वरलता- र्‍हिदमिक रेमिनिसेस ऑफ लता दीदी’ आणि किशोरी अमोणकर यांच्यावर ‘द सोल स्टिरिंग व्हॉइस-गानसरस्वती किशोरी आमोणकर’ ही पुस्तके लिहिली आहेत.   

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर,  माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंडित बिरजू महाराज यांनी वाघोलीकर यांच्या लेखन उपक्रमाचे कौतुक केले आहे. वाघोलीकर यांना इस्मा इन्स्टिट्यूटतर्फे (इंटरनॅशनल स्पिरिच्युलिटी मार्केट) अध्यात्म क्षेत्रातील दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच ‘एशियन थाई इंडियन बिझनेस लीडरशिप’ परिषदेत युवा उद्योजक सन्मान, कला गौरव राष्ट्रीय पुरस्कार, इंटरनॅशनल अचिव्हर्स पुरस्कार (दुबई), सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार, अमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘फेमिना मोस्ट पॉवरफूल ऑफ दी इअर २०१८’ पुरस्कार मिळाले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search