Next
फॉलिक अॅसिड जागरूकतेसाठी विशेष मोहिम
प्रेस रिलीज
Friday, January 12 | 03:43 PM
15 0 0
Share this story

मुंबई : फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे अनेक नवजात अर्भकांमध्ये सौम्य ते गंभीर प्रकारचे दोष निर्माण होतात. दरवर्षी सुमारे २५ ते ४० हजार अर्भके सौम्य ते गंभीर स्वरुपाच्या दोषांसह जन्म घेतात. अर्भकमृत्यूचे प्रमाण दरवर्षी वाढतच आहे. हे लक्षात घेऊन या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याकरता ‘स्पायना बायफिडा फाउंडेशन’ ही संस्था आणि अग्रगण्य औषध कंपनी मेयेर व्हिटाबायोटिक्स यांनी संयुक्तपणे ‘गो फॉलिक’ या मोहिमेचे आयोजन केले आहे. जन्मजात दोषाच्या प्रतिबंधासाठी जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ८ ते १४ जानेवारी दरम्यान फॉलिक अॅसिड जागरूकता सप्ताह साजरा केला जातो.

हा उपक्रम कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सीएसआरचा भाग म्हणून सुरू करण्यात आला आहे. ‘गो फॉलिक’ या मोहिमेसाठी अभिनेत्री रविना टंडन हिला ब्रॅंड अँबॅसेडर नेमण्यात आले आहे.

याबाबत मेयेर व्हिटाबायोटिक्सचे उपाध्यक्ष रोहित शेलाटकर म्हणाले, ‘एक न्युट्रोसिटिकल कंपनी म्हणून आरोग्यसेवा सुलभ करणे ही आमची जबाबदारी आहे असे आम्ही मानतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधनांचा लाभ घेऊन तसेच ग्राहकांच्या विशिष्ट गरजांप्रती संवेदनशीलता म्हणून आम्हाला लोकांच्या जगण्यात लक्षणीय बदल घडवून आणायचा आहे. ही मोहीम लोकांना फॉलिक अॅसिडचे महत्त्व समजावून सांगेल. एका निरोगी बाळाच्या वाढीसाठी गरोदरपणात हे घेणे किती आवश्यक आहे हे पटवून देईल.’

स्पायना बायफिडा फाउंडेशनचे संस्थापक करमरकर म्हणाले, ‘दरवर्षी सुमारे २५ ते ४० हजार अर्भके सौम्य ते गंभीर स्वरुपाच्या दोषांसह जन्म घेतात. अर्भकमृत्यूचे प्रमाण दरवर्षी वाढतच आहे. ७० टक्के जन्मजात दोषांमागील कारण हे फॉलेट्सची कमतरता हे असते आणि गरोदरपणात तसेच गर्भधारणेपूर्वीपासून आहारात फॉलिक अॅसिड आणि जीवनसत्व ब-१२चा समावेश नियमितपणे असेल, तर असे दोष बहुतांशी टाळणे शक्य आहे.’

‘गरोदरपणात फॉलिक अॅसिड तसेच जीवनसत्व ब-१२ घेऊन बाळामधील जन्मजात दोषांना प्रतिबंध करा हा महत्त्वाचा संदेश पोहोचवण्यासाठी २७ ऑगस्ट २०१५ रोजी देशभरात ‘गो फॉलिक’ सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम राज्य सरकारे, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संस्था अर्थात डब्ल्यूएचओ-भारत यांच्या सहयोगाने जनतेपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचत आहे. या उपक्रमांमध्ये जागरूकता मोहिमा, कार्यक्रम, आरोग्य शिबिरे आणि डॉक्टरांचा सहभाग आदी उपक्रमांचा समावेश आहे’, असेही करमरकर यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link