Next
‘बॅकस्टेजच्या स्पर्धा नाट्य चळवळीच्या खऱ्या पाठीराख्या’
प्रेस रिलीज
Wednesday, July 25, 2018 | 03:13 PM
15 0 0
Share this article:

अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्टस असोसिएशनतर्फे आयोजित पू. स्व. सेठ शामसुंदरजी बिहाणी (बंगडीवाला )आंतरशालेय कथाकथन स्पर्धा व स्व. मनीष कुलकर्णी स्वलिखित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांसह अभिनेते कमलाकर सातपुते, मिलिंद शिंदे, जितेंद्र बिहाणी व परी

अहमदनगर : ‘स्वतः पाठीमागे राहून, नवीन कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या बॅकस्टेजच्या स्पर्धा नाट्य चळवळीच्या खऱ्या पाठीराख्या आहेत. बॅकस्टेजच्या या स्पर्धेमुळे पुढील पिढीवर वाचन संस्कार घडण्यास नक्कीच मदत होईल. स्वतः मागे राहून, नवीन पिढीला पुढे आणण्याचे प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी आहेत. सलग १७ वर्षे ही स्पर्धा चालू आहे,या मागे शाळा, पालक, मार्गदर्शक या सर्वाचे मोलाचे योगदान आहे’, अशा शब्दात अभिनेते कमलाकर सातपुते यांनी अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्टस असोसिएशनचे कौतुक केले.

अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्टस असोसिएशन आयोजित पू. स्व. सेठ शामसुंदरजी बिहाणी ( बंगडीवाला )आंतरशालेय कथाकथन स्पर्धा व स्व. मनीष कुलकर्णी स्वलिखित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अभिनेते कमलाकर सातपुते यांच्या हस्ते नुकताच येथे पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. 

संस्थेचे अध्यक्ष मिलिंद शिंदे म्हणाले,‘ही कथाकथन व काव्यवाचन स्पर्धा नगरच्या सांस्कृतिक वर्तुळात एक वैचारिक कोलाहल घडवत असते. या स्पर्धेतून नवनवीन विषयावर आधारित कथा, कविता सादर केल्या जात आहेत. ही स्पर्धा मोठी होत आहे आणि याचे सर्व श्रेय मुले, पालक, शिक्षक, शाळा यांचे आहे. आम्ही फक्त या चळवळीचे भागीदार आहोत.’   

या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक जितेंद्र बिहाणी (बंगडीवाला) यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, ‘अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्टस असोसिएशन समुद्रातून मोती शोधण्याचे अवघड काम समर्थपणे करीत आहे. या चळवळीचा भाग होणे, हे आमचे भाग्य आहे.’ 

या वेळी महेश बिहाणी आणि बिहाणी परिवारातील सदस्य उपस्थित होते.  
 
कथाकथन स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्रसाद बेडेकर, भक्ती डांगे, डॉ. सुहास साखरे आणि देवदत्त चौसाळकर यांनी केले, तर  काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षण डॉ. अरुण मांडे, धनश्री देशपांडे –गणात्रा आणि संजीव तनपुरे  यांनी केले. 

कथाकथन स्पर्धेत दोन्ही गट मिळून, १८० स्पर्धक सहभागी झाले होते. पुणे, शिरूर, राहुरी, तसेच शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा यात सहभागी झाल्या होत्या. काव्यवाचन स्पर्धेत एकूण ७१ प्रवेशिका होत्या. कथाकथन स्पर्धेच्या परीक्षकांचा परिचय संतोष बडे आणि उपेंद्र कुलकर्णी यांनी, तर काव्यवाचन स्पर्धेच्या परीक्षकांचा परिचय प्राची कुलकर्णी-गरुड यांनी करून दिला. निकालपत्राचे वाचन अभिजीत क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र क्षीरसागर यांनी केले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता विक्रांत मनवेलीकर, सागर जोशी, दादासाहेब बेरड, संतोष खांडेकर, गौरव मिरीकर,  अमोल दाते, श्रीनाथ केसकर, जयंत कोहोळे, योगेश कुलकर्णी, जितेंद्र तागडे, मनीष घोलप, शिल्पा देशपांडे, गिरीश पोळ, सत्तार शेख, अमित काळे यांनी परिश्रम घेतले. 
 
स्पर्धेचा निकाल -
कथाकथन स्पर्धा - लहान गट
प्रथम - पार्थ नरेंद्र कुलकर्णी – सेंट विवेकानंद हायस्कूल
द्वितीय ( विभागून) – कैवल्य पुराणिक, फिरोदिया हायस्कूल  
                                 सप्तमी पैठणकर –  र.मा.धाडीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल  
तृतीय - आर्या मेहेत्रे -विद्यामंदिर प्रशाला , राहुरी 
उत्तेजनार्थ  :
           तृष्णा वाटेकर – विद्याधाम प्रशाला, शिरूर, 
           मयुरेश सरोदे - सावित्रीबाई फुले विद्यालय, राहूरी
           सिद्धी घाणेकर – भा.फि. हायस्कूल
           गौरी देशपांडे – भा.फि. हायस्कूल
         तनुजा नडोने- कन्या विद्या मंदिर

मोठा गट :
प्रथम क्रमांक -  ऋग्वेदा चंद्रशेखर कुलकर्णी - भा.फि. हायस्कूल ,
द्वितीय क्रमांक-(विभागून) - वैभवी सुनील शिंदे - सा.फुले मा विद्यालय, राहूरी
                                           सानिका खोडदे- विद्याधाम प्रशाला, शिरूर
तृतीय क्रमांक -(विभागून) – सानिका पोटे - सा .फुले मा विद्यालय, राहूरी
                                          आदिष्टी मिसाळ - भा.फि. हायस्कूल         
उत्तेजनार्थ  :
 समृद्धी संजय क्षीरसागर – रेणाविकार विद्या मंदिर , सावेडी
  समृद्धी वैकर – भा.फि.हायस्कूल 
  अनन्या झांबरे – सा. फुले. विद्यालय, राहूरी
  श्रावणी सूळ - सावित्रीबाई फुले विद्यालय, राहूरी
  सार्थक राहुल गुगळे - समर्थ प्रशाला, सावेडी 

सांघिक विजेतेपद फिरता करंडक – भा. फि. हायस्कूल, नगर 

काव्य वाचन स्पर्धा २०१८
प्रथम क्रमांक (विभागून) – अभय नरहर जोशी , अभय चंद्रकांत जोशी
द्वितीय क्रमांक  (विभागून) – शेखर चोरघे, आश्लेषा कुलकर्णी
तृतीय क्रमांक (विभागून)  –  आशिष चासकर, अर्जुन राठोड

उत्तेजनार्थ : नीता जाधव, नितीन वैशाली, धर्मराज जाधव, राहुल गरुटे, रुपाली साळवे, सदाशिव शिंदे 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search