Next
‘महिंद्रा ग्रेट एस्केप’ थराराची लोणावळ्यात सांगता
प्रेस रिलीज
Thursday, July 19, 2018 | 01:56 PM
15 0 0
Share this story

संग्रहित फोटोमुंबई : भारतभरात प्रचंड लोकप्रिय असलेला ‘महिंद्रा ग्रेट एस्केप’ या साहसी उपक्रमाचा १५०वा खेळ लोणावळ्यात नुकताच पार पडला. यात ‘टू-व्हील-ड्राइव्ह’ आणि ‘फोर-व्हील-ड्राइव्ह’ या दोन्ही प्रकारची महिंद्राची एकूण ६० वाहने सहभागी झाली होती. मुंबई, पुणे, नाशिक व परिसरातील ‘महिंद्रा’च्या ग्राहकांना या साहसी खेळाचा आनंद लुटला.

लोणावळ्याच्या तुंगी येथील ‘क्लब महिंद्रा’च्या प्रांगणात या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या, परंतु मुळात अत्यंत खडतर असलेल्या भूभागावरून बोलेरो, स्कॉर्पियो, एक्सयूव्ही, केयूव्ही आणि ‘महिंद्रा’ची सर्वात दणकट अशी ‘थर सीआरडीई फोर-बाय-फोर’ अशा ६० गाड्यांनी आपला थरारक प्रवास सुरू केला. लोणावळ्याच्या उंच-सखल भागात सहजपणे फिरत या ‘एसयूव्ही’ गाड्यांनी आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली.

अतिशय उत्कंठापूर्ण असलेल्या या प्रवासाला लोणावळ्याच्या नयनरम्य वातावरणाची पार्श्वभूमी लाभली होती. प्रवासात सहभागी झालेल्या साहसवीरांना हा परिसर नेत्रसुखद वाटत असला, तरी खडतर रस्त्यामुळे त्यांच्यासमोर आव्हानही मोठे होते. पुणे व मुंबई या दोन्ही शहरांना लोणावळा हे ठिकाण जवळ असल्याने दोन्हीकडील साहसवीरांना लोणावळ्यातीवल पावसाळी वातावरणाची व तेथील भूभागाची चांगलीच कल्पना होती.

या वर्षी स्पर्धकांना खडतर रस्त्यावरील आपले कौशल्य दाखविण्यासाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे भूभाग नेमून देण्यात आले होते. ‘टू-व्हील-ड्राइव्ह’ आणि ‘फोर-व्हील-ड्राइव्ह’ या दोन्ही प्रकारच्या वाहनांसाठी स्वतंत्र ट्रॅक दिल्याने दोन्ही वाहनांची कसोटी लागणार होती. विशेषतः ‘फोर-व्हील-ड्राइव्ह’ वाहनांना अधिक कठीण असे आव्हान देण्यात आले होते. निसरडी, तीव्र उतार, तीव्र चढण, पाण्याने खळाळणारे ओढे, खडकाळ जमीन अशा सर्व प्रकारच्या भूभागावरून आपली गाडी लिलया काढण्यातून स्पर्धकांना खेळाचा आनंद मिळत होताच, त्याशिवाय त्यांच्या गाड्यांची काटेकोर परीक्षाही होत होती.

‘महिंद्रा ग्रेट एस्केप’ हा साहसी खेळ १९९६मध्ये स्पर्धा स्वरूपात सुरू करण्यात आला. नियमित रस्त्यावरून न जाता अन्य खडकाळ, खडतर रस्त्याने गाड्या चालवून ‘महिंद्रा’च्या ग्राहकांना आपले कौशल्य व गाडीचा कणखरपणा अजमावण्याची संधी या खेळातून दिली जाते. हा खेळ दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून, आता तो देशातील सर्वात थरारक खेळ बनला आहे. देशभरातील ‘महिंद्रा’चे चाहते व धाडसी ग्राहक या खेळात सहभागी होण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

‘महिंद्रा’ची वाहने किती कणखर व मजबूत बांधणीची असतात, हे दाखविण्यासाठी महिंद्रा अॅडव्हेंचर या संस्थेमार्फत साहसी खेळांचे काही उपक्रम आयोजित करते. २०११मध्ये बिजय कुमार यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेची उभारणी झाली. बिजय कुमार हे वाहन क्षेत्रातील तज्ज्ञ असून, त्या संबंधीच्या एका लोकप्रिय मासिकाचे संपादक आहेत.

‘महिंद्राद्र अॅडव्हेंचर’ने यावर्षी अनेक उपक्रम आयोजित केले आहेत. त्यामध्ये ‘ग्रेट एस्केप’सारखा खडतर रस्त्याच्या प्रवासाचा एक-दिवसीय धाडसी खेळ, विविध प्रकारची आव्हाने, अनेक दिवस चालणारे ग्रेट एस्केप जसे की मोनास्टरी एस्केप (१० दिवस), रॉयल एस्केप (सहा दिवस), ऑथेंटिक भूतान (आठ दिवस), हिमालयन स्पिटी एस्केप (१० दिवस) आणि एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅंपपर्यंत जाणारी समिट (१४ दिवस) अशा उपक्रमांचा समावेश आहे.

खडतर भूभागावरून वाहने चालविण्याच्या खेळाची लोकप्रियता वाढावी यासाठी ‘महिंद्रा अॅडव्हेंचर’तर्फे इगतपुरी येथे महिंद्रा अॅडव्हेंचर ऑफ रोड ट्रेनिंग अॅकॅडमी चालविली जाते. सुरक्षित व नियंत्रित वातावरणात खडतर भागात वाहन कसे चालवावे, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण येथे दिले जाते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link