Next
‘अपसाउथ’ची सेवा वाकडमध्ये सुरू
प्रेस रिलीज
Saturday, July 28, 2018 | 05:10 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पुणेकरांच्या आनंदात भर घालण्यासाठी शहरातील लोकप्रिय क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) साखळी असलेल्या ‘अपसाउथ’ने वाकड येथील ग्राहकांसाठी आपली सेवा सुरू केली आहे. विमान नगर, पुणे विमानतळ, औंध, फिनिक्स मार्केट सिटी या ठिकाणी यशस्वी कामगिरी केल्यानंतर या ब्रँडने आता वाकडमध्येही आपले फ्रँचायसी आउटलेट सुरू केले आहे.

‘अपसाउथ’ रेस्टॉरंटमध्ये अस्सल, चविष्ट खाद्यपदार्थ वेगवान सेवेसह पुरविले जातात आणि ते लाइव्ह किचनद्वारे तयार होताना बघताही येतात. या रेस्टॉरंटमध्ये सेल्फ-सर्व्हिस असून सीट डाउन (खाली बसून) प्रकारातील आहे. विद्यार्थी, कुटुंब यांना शांतपणे बसून पदार्थांचा आस्वाद घेता येईल; तसेच आपल्या गंतव्य स्थळी जाण्याची गडबड असणारे नोकरदार, विमानतळावर ये-जा करणारे लोक व प्रवाशांना येथे अगदी वेगाने सेवा दिली जाईल.

हे रेस्टॉरंट वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार पदार्थ अगदी किफायती दरांत पुरवते. त्यांच्या मेनूमध्ये अत्यंत लोकप्रिय व जगभरात प्रसिद्ध झालेले अनेक पर्याय समाविष्ट आहेत. इडली व डोशांचे विविध प्रकार, मेदूवडा, उत्थप्पा, चटण्या व सांबार, फिल्टर कॉफी, पड्डू, मलबारी परोठा, दक्षिण भारतीय पदार्थांचे एकत्रीकरण (कॉम्बो), भोजन असे प्रकार येथे मिळतातच. शिवाय उथली, मलबारी परोठा सँडविच व साबुदाणा चीज वडा, एलानीर मूझ, मँगो मोक्षा व हेल्दी सुपर ग्रेन पराठा असे खास पदार्थ येथे उपलब्ध आहेत. या पदार्थांच्या किंमती स्पर्धात्मक असून, प्रतिव्यक्ती सरासरी खर्च केवळ ७० ते ८० रुपयांपर्यंत येतो. येथील पदार्थ पैशाचे पुरेपूर मूल्य देणारे आणि सर्वोत्तम दर्जाचे आहेत.

‘अपसाउथ’ हा क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) हा ब्रँड भारतातील एक आघाडीची आतिथ्य साखळी असलेल्या ‘बिलियनस्माइल्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’चा असून ‘अपसाउथ’खेरीज ‘बॉनसाउथ’, ‘साउथइंडीज’, ‘बिलियनस्माइल्स केटरिंग’ हेही नामांकित ब्रँड्स त्यांच्या मालकीचे आहेत.

‘बिलियनस्माईल्स’चे उपाध्यक्ष कुमार गौरव म्हणाले, ‘अपसाउथद्वारे आम्ही उच्च वातावरणात सोईस्कर, किफायती, आरोग्यपूर्ण व दर्जाप्रेरित दक्षिण भारतीय क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट साखळी निर्माण करण्यासाठी सज्ज आहोत. अंतर्गत गुंतवणूक व फ्रँचायसिंग पर्यायांच्या माध्यमातून आम्ही पुणे बाजारपेठेत परिणामकारक अस्तित्व निर्माण करण्याची अपेक्षा बाळगून आहोत. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ हे सर्वाधिक लोकप्रिय भारतीय खाद्यपदार्थांपैकी असून, उत्पादन म्हणूनही ते दिवसभरात कोणत्याही वेळी खाण्यासाठी सुयोग्य ठरतात. त्यामुळेच ‘अपसाउथ’ला एक यशस्वी क्यूएसआर फॉरमॅट देशभर उभारण्याची मोठी संधी आहे.’

भारतीय आणि दक्षिण भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थ आधुनिक तत्पर सेवा फॉरमॅटमध्ये, तसेच उत्पादन व सेवांचा अत्युच्च दर्जा राखून कमीतकमी वाजवी किंमतीत व सर्वाधिक आरोग्यपूर्ण वातावरणात देण्यासाठी ‘अपसाउथ’ कटिबद्ध आहे. येथील पदार्थ ताज्या घटकांपासून बनवले जातात.

‘अपसाउथ’चे कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह शेफ मनू नायर म्हणाले, ‘काळाशी सुसंगती राखून ‘अपसाउथ’ने उत्साही व समकालीन रूप देत भारतीय व दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांच्या अनुभवाची तुमच्यासाठी नवी व्याख्या केली आहे. आम्ही आरोग्यपूर्ण, चविष्ट, ताजे आणि पोटभरीचे भारतीय व दक्षिण भारतीय शाकाहारी खाद्यपदार्थ आधुनिक अशा फॉरमॅटमध्ये सादर केले आहेत.’

‘अपसाउथ’ने विस्ताराची आकर्षक योजना आखली असून, त्याअंतर्गत हा ब्रँड बावधन, पिंपळे-सौदागर, बाणेर येथे लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्याखेरीज पुणे शहरात चालू वर्षअखेरपर्यंत आणखी अनेक आउटलेट्स उघडली जाणार आहेत.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search