Next
‘लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड’साठी प्रवेशिका नोंदणी सुरू
प्रेस रिलीज
Monday, September 10, 2018 | 12:22 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : लेक्सस इंडियाने प्रतिष्ठित ‘लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडिया’च्या (एलडीएआय) दुसऱ्या पर्वाची घोषणा केली. उत्तम भविष्याची निर्मिती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या उदयोन्मुख व प्रख्यात डिझाइनर्स व क्रिएटर्ससाठी ही स्पर्धा एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. ‘लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडिया’साठी अर्ज व प्रवेशिका सुरू झाल्या आहेत. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख २८ ऑक्टोबर २०१८ आहे.

‘लेक्सस’च्या मते समाजाला भेडसावत असलेल्या विविध समस्यांसाठी योग्य सोल्यूशन्स आणण्यासाठी डिझाइन थिकिंग महत्त्वाचे आहे. लेक्सस ब्रॅंडचे मूलभूत तत्त्वे असलेल्या डिझाइन, एर्गोनॉमिक्स, स्थिरता, उच्च तंत्रज्ञान आणि जबाबदारीपूर्ण वापर यांमधील सर्वोत्तमतेला पुरस्कारासह सन्मानित करण्यासाठी ‘लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडिया’ हा पुरस्कार तयार करण्यात आला आहे. डिझाइनच्या माध्यमातून जगाला राहाण्याचे उत्तम ठिकाण बनवणे हा प्रोग्रामचा मूळ हेतू आहे. यंदाच्या स्पर्धेत सहभागींची सर्जनशील कल्पना ‘अँटीसिपेट’, ‘इनोव्हेट’ व ‘कॅप्टिव्हेट’ या ‘लेक्सस’च्या तीन मूलभूत तत्त्वांना कशाप्रकारे सामावून घेते, तसेच त्यांच्या डिझाइन कशाप्रकारे भावी समाजाच्या गरजांचा अंदाज करतात याबाबत परीक्षण करण्यात येणार आहे.

‘लेक्सस इंडिया’चे अध्यक्ष पी. बी. वेनुगोपाळ म्हणाले, ‘आम्हाला ‘लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडिया’च्या दुसऱ्या पर्वाच्या घोषणेसोबतच अत्यंत प्रतिभावान भारतीय डिझाइन समुदायामधून प्रवेशिकांची मागणी करताना खूप आनंद होत आहे. ‘लेक्सस डिझाइन अॅवॉर्ड इंडिया’ ब्रॅंडच्या स्थिर डिझाइनच्या मूल्यांमध्ये सामावलेला आहे. आम्ही सहभागींना जागतिक व्यासपीठावर त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी देण्याचा प्रयत्न करतो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search