Next
टाटा मोटर्स आणि इंडियन ऑईलतर्फे ‘डिझेल भरो-ट्रक जितो’ मोहीम
BOI
Saturday, September 14, 2019 | 03:16 PM
15 0 0
Share this article:

‘डिझेल भरो-ट्रक जितो’ मोहिमेचे उद्घाटन करताना इंडियन ऑईलचे संचालक गुरमीत सिंग आणि टाटा मोटर्सचे आर. टी. वासन

मुंबई : टाटा मोटर्सतर्फे इंडियन ऑईल कंपनीच्या सहकार्याने सणासुदीच्या काळात डिझेलच्या विक्रीला चालना देण्यासाठी ‘डिझेल भरो-ट्रक जितो’ मोहीम दाखल करण्यात आली आहे. देशभरातील २७ हजार ‘आयओसीएल’ पंपांवर ही योजना लागू आहे. इंडियन ऑईलचे संचालक (विपणन) गुरमीत सिंग आणि टाटा मोटर्सच्या एमएचसीव्हील प्रॉडक्ट लाइन, सीव्हीटबीयूचे उपाध्यक्ष आर. टी. वासन यांच्या हस्ते मुंबई-पुणे महामार्गावरील सारसन येथील इंडियन ऑईलच्या दालनामध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

‘डिझेल भरो-ट्रक जितो’ ही मोहीम ९० दिवस चालणार असून, १० सप्टेंबर २०१९ ते आठ डिसेंबर २०१९ या काळात इंडियन ऑईलच्या पंपावर एकाच बिलात ५० लिटर किंवा त्याहून अधिक डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नवाकोरा टाटा अल्ट्रा ट्रक हे बंपर बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे, तर प्रत्येक ३० दिवसांनी विजेता घोषित केला जाईल. ४५ नशीबवान विजेते दर एक दिवसाआड टाटा एस गोल्ड जिंकू शकतील. त्याचप्रमाणे १० हजार नशीबवान ग्राहकांना एक हजार रुपयांचे हाय स्पीड डिझेल जिंकण्याचीही संधी मिळेल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी फक्त आपल्या बिलाची माहिती आणि खरेदी केलेल्या डिझेलचे प्रमाण ही माहिती ९९११४ १०००० या क्रमांकावर ‘एसएमएस’ने पाठवायची आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आर. टी. वासन म्हणाले, ‘उत्कृष्ट उत्पादने आणि खात्रीशीर परफॉर्मन्सचे बळ एकमेकांना देत आयओसीएलसोबतच्या दीर्घकाळाच्या नातेसंबंधांचा टाटा मोटर्सला अभिमान वाटतो. या ‘डिझेल भरो-ट्रक जितो’ मोहिमेतून आम्ही आमच्या सर्व ग्राहकांमध्ये उच्च दर्जाचे हाय स्पीड डिझेल, टाटा मोटर्स जेन्युइन ऑईल आणि टाटा मोटर्स डीईएफला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहोत. नाविन्यतेचे नवे मापदंड रचणाऱ्या मोहिमांना आम्ही नेहमीच पाठिंबा देतो. आमचे ट्रक नेहमीच नव्या प्रयोगांना अनुरूप असतात आणि त्यामुळे ग्राहकांना आरामदायी प्रवासाचा लाभ मिळण्याची खातरजमा होते.’

इंडियन ऑईलचे संचालक (विपणन) गुरमीत सिंग म्हणाले, ‘इंडियन ऑईलच्या प्रत्येक ग्राहकाला योग्य सेवा मिळावी, हा इंडियन ऑईलचा कायमच प्रयत्न राहिला आहे. ग्राहकांना आनंद देणे आणि त्यांच्यासोबत जोडले जाण्यासाठी ही मोहीम म्हणजे आणखी एक नवा प्रयत्न आहे. या मोहिमेमुळे अधिकाधिक ग्राहक इंडियन ऑईल कुटुंबाचा भाग बनतील आणि त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची संधी आम्हाला देतील, अशी आम्हाला आशा आहे.’

२००५ मध्ये सादर झालेल्या टाटा एसने भारतात मिनि-ट्रक्सची नवी व्याख्या यशस्वीरित्या मांडली. आजवर देशभरात विविध प्रकारचे २२ लाखांहून अधिक एस ट्रक्स विकले गेले आहेत. टाटा एस प्रकारातील वाहने बाजारपेठातील गरजा ओळखून, ती दरी भरून काढत सतत उत्क्रांत होत आहेत. टाटा मोटर्सतर्फे सादर करण्यात आलेले अल्ट्रा ट्रक्स ग्लोबल ट्रकिंग स्टँडर्डसप्रमाणे तयार करण्यात आले असून, त्यातून उत्कृष्ट इंधनक्षमता, बहुउपयोगिता, ऊर्जा, वेग, सामान वाहून नेण्याची क्षमता मिळतेच. शिवाय, हे ट्रक स्टायलिश, भविष्यवेधी आणि कारप्रमाणे स्मार्ट वैशिष्ट्य असलेले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Trupti vaidya About 34 Days ago
Very good step.... agressivए n smart steps to overcome today"s situation.......I hope you will create new parameters... Best of luck💐💐 to Tata motors team & IOC team Best efforts
0
0

Select Language
Share Link
 
Search