Next
जमीन हस्तांतरण प्रक्रियेला तत्त्वतः मान्यता
प्रेस रिलीज
Monday, March 05 | 05:12 PM
15 0 0
Share this story

अनिल शिरोळेपुणे : ‘लोहगाव विमानतळसंबंधी राज्य सरकारतर्फे २५ एकर जमीन हस्तांतरण प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री तसेच केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला ३० जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या पायाभूत समितीच्या बैठकीत दिले होते. त्यानंतर नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली असून जागा देण्याचे तत्त्वतः मान्य करण्यात आली आहे,’ अशी माहिती आमदार अनिल शिरोळे यांनी दिली.

संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. यासंबंधी पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधिताची बैठक पुणे महापालिका आयुक्त यांनी बोलाविण्याची सूचना ही गडकरी यांनी केली असून, त्यानुसार महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी शिरोळे यांनी तातडीने बैठक घेण्यास सांगितले आहे. यावर तातडीने बैठक ठरवली जाईल, असे जिल्हाधिकारी कुमार यांनी सांगितले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link