Next
‘स्वरवंदना’ स्वरभास्करास...
प्रेस रिलीज
Tuesday, February 13 | 04:39 PM
15 0 0
Share this story

पुणे : अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतात ज्याचे स्थान सूर्याप्रमाणे अढळ आहे, असे व्यक्तीमत्व म्हणजे भारतरत्न पं. भीमसेन जोशी. पं. भीमसेन जोशी यांची जयंती याच महिन्यात असते, याबरोबरच त्यांना भारत सरकारच्या भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने देखील याच महिन्यात सन्मानित करण्यात आले होते.

याचेच औचित्य साधत पुण्यातील कलाश्री संगीत मंडळ आणि एजी डायग्नॉस्टिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने   ‘स्वरवंदना’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  आहे. येत्या रविवारी १८ फेब्रुवारीला, सायंकाळी ५.३० वाजता कोथरूड येथील कर्नाटक हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर तो दिला जाईल. 

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध शास्त्रीय गायक व पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे व पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र, शिष्य श्रीनिवास जोशी आणि नातू विराज जोशी हे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना आपल्या गायकीतून स्वरवंदना देणार आहेत. 

या कार्यक्रमात पं. भीमसेन जोशी यांच्या अद्वितीय गायकीचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी गायलेल्या बंदिशी, ठुमरी, नाट्यपदे, मराठी अभंग यांबरोबरच हिंदी व कानडी भजने आदींचा समावेश असणार आहे. यामुळे पंडितजींची समृद्ध गायकी त्यांच्या शिष्यांतर्फे पुन्हा एकदा रसिकांसमोर येईल आणि त्यांच्या स्मृती जागविल्या जातील तसेच; आनंद भाटे व श्रीनिवास जोशी हे पंडितजींचे हे दोन्हीही शिष्य त्यांच्या गुरुंविषयीच्या काही आठवणी देखील सांगणार आहेत.

या कार्यक्रमात पांडुरंग पवार  तबला, तन्मय देवचक्के  संवादिनी तर, माऊली टाकळकर टाळाची साथ करतील.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link