Next
‘माहेर’च्या गणेशोत्सवाला सामाजिक संदेशाची परंपरा
BOI
Monday, September 17 | 12:42 PM
15 0 0
Share this story



रत्नागिरी :
रत्नागिरीपासून १५ किलोमीटरवर असलेल्या निवळी गावातील माहेर संस्थेमध्ये यंदाचा गणेशोत्सव स्वच्छतेचा संदेश देत साजरा केला जात आहे. या संस्थेतील गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे दर वर्षी काही ना काही तरी सामाजिक संदेश या उत्सवाच्या निमित्ताने दिला जातो. तसेच, गेली १० वर्षे हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा होत आहे. 

पर्यावरणपूरक मूर्ती

अनाथ, निराधार मुली-मुले, तसेच निराधार महिला आणि पुरुषांसाठी माहेर संस्था कार्यरत आहे. सध्या संस्थेत ३५ मुले-मुली, तसेच ६० महिला आणि पुरुष आहेत. या सर्वांना जगण्याचा आनंद घेता यावा, या उद्देशाने संस्थेत विविध सण, उत्सव साजरे केले जातात. संस्थेतील मुलांनी अधीक्षक सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुबक अशी गणेशाची पर्यावरणपूरक मूर्ती तयार करून तिची संस्थेत प्रतिष्ठापना केली. मखर आणि सजावटही संस्थेतील व्यक्तींनीच केली.

संस्थेतील उत्सव सात दिवस साजरा केला जातो. दररोज सकाळ-सायंकाळी आरती, प्रसाद याचबरोबर संस्थेतील प्रवेशितांसाठी रोज वेगवेगळी स्पर्धा घेतली जाते. विजेत्यांना सायंकाळी आरतीच्या वेळी बक्षीस दिले जाते. समाजाला काही तरी संदेश देण्याच्या हेतूनेच येथील सण साजरे केले जातात. संस्थेचे अधीक्षक कांबळे यांच्यासह मीरा गायकवाड, अमित चव्हाण, आशिष मुळ्ये, शीतल हिवराळे, विजया कांबळे, शिल्पा डांगे, अनुदेवी राजपुरोहित, फुलाबाई पवार, सीता मिश्रा, मार्था पॉल, जोसेफ दास आणि संस्थेत प्रवेश घेतलेल्या सर्वांच्या योगदानातून हे साकार होत आहे. 

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील गणेशोत्सवाच्या विशेष बातम्या व लेख https://goo.gl/X8v1iW या लिंकवर वाचता येतील. )
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link