Next
‘टाटा टिगोर’ सेल्फ ड्राइव्हसाठी पुण्यात उपलब्ध
प्रेस रिलीज
Friday, December 21, 2018 | 03:04 PM
15 0 0
Share this story

पुणे : सध्याच्या काळात शेअरिंग तत्वावर वहन उपभोक्त्यांची संख्या वाढत आहे. या वाढत्या बाजारपेठेत टाटा मोटर्सने पुण्यात टाटा टिगोर ही इलेक्ट्रिक व्हेइकल (इव्ही) सादर करण्यासाठी सेल्फ ड्राईव्हसाठी भाडेतत्वावर गाड्या देणाऱ्या ‘झूमकार’बरोबर भागीदारी केली.

या संदर्भात पुण्यात झालेल्या कार्यक्रमात इलेक्ट्रिक मोबिलिटी बिझनेस अँड कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी अध्यक्ष शैलेश चंद्रा आणि ‘झूमकार’चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग मोरान यांनी बाणेरमध्ये टिगोर ‘ईव्ही’च्या पहिल्या तुकडीला झेंडा दाखविला.

या वेळी बोलताना चंद्रा म्हणाले, ‘भविष्यात गतिशीलता ही जोडलेली, एकत्रित आणि शून्य उत्सर्जन तंत्रज्ञान क्षमता असणारी असेल. परिवर्तनाच्या या प्रवासाला टाटा मोटर्सही बांधील आहे आणि ही यंत्रणा मजबूत करण्यासाठी सगळ्या समविचारी सहकाऱ्यांसोबत काम करत आहे. पुण्यातील नागरिकांसाठी शेअरिंग पातळीवर इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्युशन सादर करण्यासाठी ‘झूमकार’बरोबर भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. पुणेकरांसाठी शून्य उत्सर्जन वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ‘झूमकार’च्या सहकार्याने सेल्फ ड्राईव्ह रेंटल प्लॅटफॉर्मवर आता टाटा टिगोर ईव्हीस उपलब्ध आहे. आमच्या ग्राहकांकडून आम्हांला पसंतीची पावती मिळेल आणि त्यांचा ड्रायव्हिंग अनुभव चांगला ठरेल, याची आम्हाला खात्री आहे.’

या भागीदारीबद्दल बोलताना मोरान म्हणाले, ‘पुण्यामध्ये इलेक्ट्रिक वाहने आणण्यासाठी झूमकार टीमला टाटा मोटर्सबरोबर भागीदारी करताना खूप आनंद होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील क्रांतिकारी भागीदारीची ही सुरुवात ठरेल आणि पुढील वर्षी टाटा कंपनीसोबत २० शहरांत ५०० इलेक्ट्रिक वाहने सुरू करण्याची आम्हाला अपेक्षा आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link