Next
‘क्षितिजापलीकडे पाहिल्यासच चांगल्या समाजाची निर्मिती’
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या विविध पुरस्कारांचे वितरण
BOI
Monday, December 17, 2018 | 01:11 PM
15 0 0
Share this story

पुरस्कारप्राप्त व्यक्तींसमवेत चित्रा कशाळकर, माधव हिर्लेकर आणि संघाचे सदस्य. (छायाचित्र - प्रसाद जोशी, रत्नागिरी)

रत्नागिरी :
‘निर्मितीची प्रक्रिया नियती आणि निश्चयाची सांगड घातल्यानंतर होते. निर्मिती करताना तेवढ्यापुरतेच थांबून न राहता, क्षितीजापलीकडे जाण्याचा, उत्तुंग कामगिरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. क्षितिजापलीकडे जाण्याचा प्रयत्न केल्यास, तसा दृष्टिकोन असल्यासच चांगला समाज घडवला जातो. आजच्या पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये ते विशेष गुणधर्म असल्यानेच ते कौतुकास पात्र आहेत,’ असे प्रतिपादन कोल्हापूर येथील निवृत्त प्राध्यापिका चित्रा कशाळकर यांनी केले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने जाहीर केलेल्या यंदाच्या पुरस्कारांचे वितरण १६ डिसेंबर २०१८ रोजी संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, सदस्य सी. यू. हळबे, दिलीप ढवळे, अॅड. प्रिया लोवलेकर, मानस देसाई, उदय काजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमात ‘सकाळ’चे पत्रकार मकरंद पटवर्धन यांना दर्पण पुरस्कार, वेदमूर्ती रवींद्र पटवर्धन यांना आदर्श पौराहित्य पुरस्कार, मुग्धा पाध्ये यांना आचार्य नारळकर पुरस्कार, ह. भ. प. पुंडलिक हळबे यांना आदर्श कीर्तनकार पुरस्कार, वैद्य सुविनय दामले यांना धन्वंतरी पुरस्कार, योगेश सरपोतदार यांना उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

‘या पुरस्कारामुळे माझ्या कामाची जबाबदारी वाढली आहे, याची जाणीव आहे. ती जबाबदारी पार पाडण्याचे पुरेपूर प्रयत्न मी करीन,’ असे मनोगत मकरंद पटवर्धन यांनी व्यक्त केले. आजच्या काळात तरुणांना पत्रकारिता आणि फोटोग्राफी या क्षेत्रांत खूप संधी आहेत, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

‘मी नाटे येथील शाळेत शिकवत असताना विद्यार्थ्यांसाठी अधिक काही करायचे ठरवले. विद्यार्थ्यांमध्ये कला टिकवून ठेवून त्यांच्यामध्ये आवड निर्माण करण्याचा प्रयत्न मी करते,’ असे मुग्धा पाध्ये यांनी सांगितले. 

‘या पुरस्कारामुळे आणखी काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे,’ असे योगेश सरपोतदार म्हणाले. ह. भ. प. हळबे आणि रवींद्र पटवर्धन यांनीही मनोगतामध्ये अशाच भावना व्यक्त केल्या आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे विशेष ऋण व्यक्त केले.

अभयराज जोशी, सुधीर नवाथे, संजय नवाथे, अनिकेत हर्षे, मिलिंद आठल्ये, सुहास ठाकुरदेसाई, सिद्धी बोंद्रे, ओंकार पेंढारकर, आदित्य पंडित यांना या वेळी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विवाहाला ५० वर्षे झालेल्या ज्ञातीतील जोडप्यांचा आणि देणगीदारांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव हिर्लेकर यांनी, तर आभारप्रदर्शन शिल्पा पळसुलेदेसाई यांनी केले.

(पुरस्कारप्राप्त व्यक्तींचे अल्प परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link