Next
‘लीला पूनावाला’चा दहावी-बारावीचा निकाल १०० टक्के
प्रेस रिलीज
Monday, June 18 | 05:29 PM
15 0 0
Share this story

पुणे : लीला पूनावाला फाउंडेशन (एलपीएफ) शिष्यवृत्तीद्वारे वंचित, पण हुशार मुलींना शिक्षणासाठी पाठिंबा देते. नुकत्याच घोषित झालेल्या एसएससी आणि एचएससी परीक्षांमध्ये लीला पूनावाला फाउंडेशनच्या मुलींनी चमकदार कामगिरी केली आहे. लीला ज्युनियर्स आणि लीला सीनियर्सच्या चौथ्या बॅचचा एसएससी बोर्ड आणि एचएससी बोर्डचा निकाल १०० टक्के लागला आहे.

‘एलपीएफ’ने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि शिकण्याची इच्छा असरणाऱ्या हुशार मुलींना पाठिंबा देतो. या मुलींचा सातवी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च ‘एलपीएफ’ उचलतो. यंदाचे हे ‘एलपीएफ’चे आठवे वर्ष आहे. यावर्षी २० टक्यांपेक्षा जास्त मुलींना ८० टक्के मार्क मिळविले आहेत, तसेच अन्य मुलींना ७० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहे. लीला सीनियर्सला देखील एकूण ७० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

मुलींच्या शिक्षणासाठी आणि संपूर्ण विकासासाठी आवश्यक असलेला सर्व खर्च फाउंडेशन उचलते. जोपर्यंत त्या पदवीधर होत नाही तोपर्यंत त्यांचा पूर्ण खर्च परतफेडीची अपेक्षा न करता संपूर्णत: निःशुल्क तत्त्वावर करत आहे. गरजू मुलींचे भविष्य सुरक्षित करून त्यांना स्वत:च्या पायावर समर्थपणे उभे करण्यासाठी ‘एलपीएफ’ नेहमीच प्रयत्नशील आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link