Next
‘क्रेडाई पुणे मेट्रो’तर्फे कामगारांची आरोग्य तपासणी
BOI
Saturday, September 15, 2018 | 02:22 PM
15 0 0
Share this article:

पुणे : बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्य तपासणीची मोहीम ‘क्रेडाई-पुणे मेट्रो’तर्फे राबवली जात असून, पिंपरी-चिंचवडमध्ये या मोहिमेतील पहिले आरोग्य शिबिर स्पर्श हॉस्पिटलच्या सहकार्याने घेण्यात आले. ‘फरांदे स्पेसेस’च्या ‘पुनेविले’ या बांधकाम साइटवर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात ४३०हून अधिक बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सामान्य आरोग्य तपासणीबरोबरच या शिबिराच्या ठिकाणी विविध आजार व लसीकरणाबद्दल जनजागृती करण्यात आली. कामगारांना धनुर्वाताचे इंजेक्शन तसेच औषधेही मोफत देण्यात आली.

‘फरांदे स्पेसेस’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल फरांदे, संचालक आकाश फरांदे, ‘क्रेडाई पुणे मेट्रो’च्या कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, कामगार कल्याण समितीचे सदस्य मिलिंद तलाठी, पराग पाटील, सपना राठी, ‘क्रेडाई पुणे मेट्रो’चे महासंचालक डॉ. जी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापक उर्मिला जुल्का, स्पर्श हॉस्पिटलचे अस्थिविकार तज्ज्ञ डॉ. प्रकाश पाचपुते, महाव्यवस्थापक वेरोनिका जेरी, ‘क्रेडाई’चे आस्थापना व कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी या वेळी उपस्थित होते.

डी. के. अभ्यंकर म्हणाले, ‘क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे घेण्यात येणाऱ्या या प्रकारच्या आरोग्य शिबिरांमुळे बांधकाम कामगारांमध्ये आरोग्याविषयी जागृती वाढीस लागेल. त्यामुळे त्यांचे आरोग्य तर चांगले राहीलच, शिवाय कार्यक्षमता वाढण्यासाठीही मदतच होईल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search