Next
जीवामृत
BOI
Wednesday, October 10, 2018 | 09:50 AM
15 0 0
Share this article:

निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी दूध पिण्याचा सल्ला डॉक्टरांपासून अनेकजण देतात. बाल जन्माला आल्यानंतर पहिले काही महिने त्याला केवळ दुधाचाच आहार असतो. दूध प्राशनाने ताकद, दीर्घायू लाभते. त्यातही देशी गाईचे दूध सेवन होणाऱ्या फायद्यांचा उल्लेख करीत डॉ. कुणाल रसाळ यांनी ‘जीवामृत’मधून दूधरूपी पोषणरसाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.

भारतीय परंपरेतील ग्रंथांमधून वर्णन केलेले दुधाचे उपयोग यात विशद केले आहेत. आचार्य वाग्भटांनी दुधाचे वर्गीकरण आठ प्रकारांत केले आहे. त्याप्रमाणे गाय, म्हैस, बकरी, हत्तीण, मेंढी, उंटीण व एका खुराच्या प्राण्याचे दूध (घोडा, गाढव) असे प्रत्येक दुधाचे वर्णन, गुणधर्म व त्याचा उपयोग या पुस्तकातून सांगितला आहे. त्याचप्रमाणे पक्क व अपक्क दूध, देशी व विदेशी (जर्सी) गाय यांच्यातील फरक, दुधाचे प्रकार, गाईच्या दुधातील घटक, दुधापासून तयार होणारे दही, ताक, लोणी, तूप, खरवस खाण्याने होणारे फायदे यात दिले आहेत.

प्रकाशक : शिवमुद्रण प्रकाशन
पाने : ८६
किंमत : १८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search