Next
सागर किनाऱ्यावरील सात जिल्ह्यांसाठी एकच संनियंत्रण समिती
कांदळवन संरक्षण व संवर्धनासाठी शासनाचा निर्णय
प्रशांत सिनकर
Wednesday, October 17, 2018 | 05:30 PM
15 0 0
Share this article:

ठाणे : सागर किनारा असलेल्या सात जिल्ह्यांसाठी कांदळवन संरक्षण व संवर्धनासाठी आता एकच संनियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, कोकण विभागीय आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील.

यापूर्वी नवी मुंबई, तसेच मुंबई व मुंबई उपनगर यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या संनियंत्रण समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. महसूल व वन विभागाने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांच्या स्वाक्षरीचा शासन निर्णय जारी केला आहे.

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या सात जिल्ह्यांसाठी आता ही समिती असेल. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सह अध्यक्ष), पोलीस आयुक्त मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पोलीस अधीक्षक मुंबई वगळून सर्व जिल्हे, आठ पालिकांचे आयुक्त, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक ठाणे, कोल्हापूर, एमएमआरडीए, सिडको, म्हाडा, एमआयडीसी, एसआरए, सर्व जिल्हाधिकारी, महाराष्ट्र सागरतटीय क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपवनसंरक्षक कांदळवन, नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट प्रिझर्व्हेशन सोसायटी, वनशक्ती, बॉम्बे एन्व्हायर्नमेंट अॅक्शन ग्रुप, महाराष्ट्र मच्छीमार कृती संघ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री यांचे प्रतिनधी देखील या समितीत असतील.

या समितीचे कार्य कांदळवन संरक्षण आणि संवर्धनाच्या मर्यादेत, परंतु व्यापक स्वरूपाचे असून, यात मध्यवर्ती तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे, उपाययोजना सुचविणे , सीसीटीव्ही पाळावे व निगराणी अशा अनेक बाबींचा समवेश आहे. या समितीने आपला पहिला अनुपालन अहवाल एक डिसेंबर २०१८ पूर्वी उच्च न्यायालयाला सादर करायचा आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search