Next
पोर्तुगाल ते नाशिक.. सायकलवरून...!
BOI
Friday, August 31, 2018 | 02:20 PM
15 0 0
Share this article:

योगेश गुप्तानाशिक : नाशिकमधील योगेश गुप्ता नावाच्या तरुणाने एक अनोखा विक्रम केला आहे. पोर्तुगाल ते नाशिक हे २४ हजार किलोमीटरचे अंतर त्याने सायकलवरून पार केले आहे. अडीच वर्षांत हे अंतर पार करून तो नाशिकला पोहोचला. स्वतःच्या गरजा कमीत कमी ठेवून जीवनात वेगळे काही तरी करायचे, या विचारातून त्याने हे शिवधनुष्य पेलले.

आपले शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर योगेश पेट्रोलियम इंजिनिअर झाला. हुशार असल्यामुळे करिअरमध्ये पुढेपुढे जात राहिला. त्याच्यासाठी जगाची कवाडे उघडी होती. कारण पेट्रोलियम क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम पगार आणि आवश्यक सुखसुविधा असल्याने एक एक टप्पा पादाक्रांत करत तो आखाती देश, युरोप, लॅटिन अमेरिका आणि अन्यत्र जात राहिला. जसा जसा फिरू लागला, लोकांना भेटू लागला, जग बघू लागला आणि करिअरव्यतिरिक्त विचार करू लागला, तशी त्याची अस्वस्थता वाढत गेली. काळ जात राहिला, तशी अस्वस्थता वाढत गेली आणि एक दिवस या माणसाने नोकरी सोडून प्रवास करायचे ठरवले. 


तेव्हा तो लॅटिन अमेरिकेत होता. साधारणपणे १५ हजार किलोमीटर प्रवास त्याने बाइकवरून केला. त्याचे आयुष्य आमूलाग्र बदलले. तिथून त्याने इंग्लंडमध्ये येऊन पुढील सहा महिन्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि आखाती देशात नोकरी पत्करली. परिस्थिती बदलली पण प्रश्न अनुत्तरित राहिले. त्यावर त्याला प्रवास हाच तोडगा सापडला. 

‘माणसाला जीवनात किती पैसा लागतो? त्याचे जीवनचक्र कसे असते? शिक्षण, लग्न, मुले, नंतर आयुष्याच्या शेवटी हॉस्पिटल आणि मग मरण... मला जीवनात नेमके काय करायचे आहे, ते कळत नव्हते; पण हे मात्र करायचे नव्हते. म्हणूनच मग प्रवास आणि तोही सायकलने करायचे ठरवले. हा प्रवास संथ असतो; पण तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येतो. सायकलवरून बरेच काही नेता येत नसल्यामुळे तुमच्या गरजाही सीमित राहतात. सुरुवातीला मी एवढ्या मोठ्या प्रवासाचे नियोजन केले नव्हते. छोटा प्रवास ठरवला आणि हळूहळू तो वाढवत गेलो. सगळ्या प्रवासात आलेले वेगवेगळे अनुभव शिकविणारे आहेत,’ असे योगेश म्हणाला.

पोर्तुगाल ते नाशिक असा २४ हजार किलोमीटरचा प्रवास त्याने अडीच वर्षांत सायकलवरून पूर्ण केला आहे. त्याच्या या विक्रमाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(कन्याकुमारी ते लेह अशी सायकलयात्रा करणाऱ्या प्रा. वासंती जोशी यांच्या मोहिमेबद्दलचे वार्तांकन, त्यांची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search