Next
शेकटकर समितीच्या शिफारशींवर अंमलबजावणी
प्रेस रिलीज
Friday, March 09, 2018 | 04:47 PM
15 0 0
Share this story

पुणे : सशस्त्र दलांच्या लढाऊ क्षमतेत वाढ करण्याबरोबरच खर्चाच्या संतुलनासाठी शिफारसी करण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्रालयाने निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने डिसेंबर २०१६मध्ये आपला अहवाल सादर केला. समितीच्या शिफारशी लक्षात घेऊन संरक्षण मंत्रालयाने या अहवालानुसार काही शिफारसींवर अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे.

यात लष्करातील कार्यालयीन कर्मचारी वर्ग आणि वाहन चालकांच्या पद भरती मानकांमध्ये सुधारणा करणे, राष्ट्रीय छात्र सेनेची सक्षमता वाढवणे, पुरवठा आणि वाहतूक एककांकडून अधिक चांगली कामगिरी करून घेणे, यासह इतर शिफारशींचा समावेश आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. या शिफारशी देशाच्या सुरक्षेच्या हितार्थ असल्याने त्या शिफारशी किंवा अहवाल सार्वजनिकरित्या उपलब्ध न केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link