Next
पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळातर्फे क्रीडा महोत्सवाचे आयोजन
शशिकांत घासकडबी
Friday, January 18, 2019 | 01:52 PM
15 0 0
Share this article:नंदुरबार :
नंदुरबारमधील पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळातर्फे चालवले जाणारे एकलव्य विद्यालय व नंदुरबारचे ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय यांच्यातर्फे २०१८-१९च्या संस्थांतर्गत क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन नुकतेच झाले. दिवंगत अॅड. जयवंत गणपत नटावदकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि दिवंगत शालिनी जयवंत नटावदकर यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. 

नंदुरबार नगरपालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष परवेज खान करामत खान यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा महोत्सवाच्या क्रीडा ज्योतीचे प्रज्ज्वलन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास नटावदकर, एकलव्य विद्यालयाच्या प्राचार्या सुहासिनी नटावदकर, माजी विद्यार्थी खेळाडू दीवरसिंग वळवी, डॉ. समिधा वळवी, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त बळवंत निकुंभ, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे युवराज पाटील, सचिव मीनल वळवी, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक चंद्रकांत हजारी, रमेश शहा, क्रीडाशिक्षक मयूर ठाकरे, राज जयकर, चव्हाण, राष्ट्रीय खेळाडू जयदीप नटावदकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले. या वेळी खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल आणि बुद्धिबळ या खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यात प्रत्येकी १२ शाळांतील तीन गटांतून एकूण १४४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search