Next
‘‘आयटीआय’मध्ये सुमारे ५० हजार प्रवेश क्षमता वाढविणार’
कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. पाटील यांची माहिती
प्रेस रिलीज
Friday, June 21, 2019 | 11:44 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : राज्यातील तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्यासाठी औद्योजिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) सुमारे ५० हजार प्रवेश क्षमता वाढविणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.

‘आयटीआय’मध्ये ५० हजार प्रवेश क्षमता वाढविण्याबाबतची लक्षवेधी सूचना जगन्नाथ शिंदे यांनी मांडली होती. त्याला उत्तर देताना डॉ. पाटील बोलत होते. या चर्चेत दत्तात्रय सावंत, सुधीर तांबे, नागोराव गाणार, रामहरी रुपनवर, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आदींनी सहभाग घेतला.

डॉ. पाटील म्हणाले, ‘राज्यातील तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्यासाठी शासनाने राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात ४१७  शासकीय व ४२५ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक ते दोन वर्ष कालावधीचे अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी अशा ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांध्ये प्रशिक्षण देण्यात येते. या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रत्येक वर्षी सरासरी एक लाख ४० हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत असतात.

‘राज्यात तंत्रनिकेतनमध्येही (पॉलिटेक्निक) ‘आयटीआय’चे कोर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यभरात ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी जिथे मागणी असेल तिथे कोर्स सुरू केले जातील; तसेच प्रवेश क्षमता व तुकड्यांची संख्याही वाढविली जाईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ‘आयटीआय’मधील  अद्ययावत यंत्रसामुग्रीची आवश्यकता भासेल तिथे ते देण्यात येईल. कल्याण येथील ‘आयटीआय’ या शैक्षणिक वर्षापासून सुरू केले जाईल,’ अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search