Next
‘होंडा टूव्हीलर्स’ने केला ४० दशलक्ष विक्रीचा टप्पा पार
प्रेस रिलीज
Friday, December 21, 2018 | 12:46 PM
15 0 0
Share this storyनवी दिल्ली : भारतीय दुचाकी उद्योगक्षेत्रात इतिहास घडवत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ४० दशलक्ष दुचाकी विक्रीचा टप्पा पार केला. यामुळे केवळ १८ वर्षांच्या कालावधीत एवढ्या युनिट्स विक्रीचा टप्पा गाठणारी ‘होंडा’ ही भारतातील एकमेव दुचाकी कंपनी ठरली आहे.

‘होंडा’ने पहिल्या ११ वर्षांतच पहिले १० दशलक्ष ग्राहक मिळवले. त्यानंतर तिप्पट वेगाने प्रगती करत कंपनीने पुढील केवळ तीनच वर्षांत आणखी १० दशलक्ष ग्राहक संपादन केले. १४ वर्षांत २० दशलक्ष ग्राहक मिळवल्यानंतर आपल्या नेतृत्वाखाली वेगवान प्रगती करणाऱ्या भारताच्या दुचाकी बाजारपेठेत ‘होंडा’ने चारच वर्षांत २० दशलक्ष ग्राहक मिळवले.

या बद्दल बोलताना ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिनोरू काटो म्हणाले, ‘इतक्या कमी वेळात ४० दशलक्ष ग्राहकांनी ‘होंडा’वर आपले प्रेम आणि व्यक्त केलेला विश्वास आम्हाला सन्माननीय वाटतो. सुरुवातीपासूनच ‘होंडा’ने दर्जेदार, नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करत लाखो ग्राहकांना आनंद मिळवून देण्यावर भर दिला आहे.’

‘होंडा’च्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल ‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’चे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री आणि विपणन) यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ४० दशलक्षपेक्षाही जास्त ग्राहकांना असामान्य सफरीचा आनंद दिल्याचा ‘होंडा टू व्हीलर्स इंडिया’ला अभिमान वाटतो. स्कूटर आणि मोटरसायकलची विस्तृत श्रेणी, वेगाने विस्तारणारे नेटवर्क, ग्राहकस्नेही सेवा यांसह ‘होंडा’ आपल्या ग्राहकांना या पुढेही आनंद वाटण्यासाठी सज्ज आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link